Sharad Pawar Vs Ajit Pawar | अजित पवारांची महायुतीच्या जागावाटपात ताकद किती?, 2 घरचे, 2 बाहेरचे इतकीच?, थोरल्या पवारांना मिळाल्या तब्बल 10 जागा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar Vs Ajit Pawar | अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट (Ajit Pawar NCP) पाडल्यानंतर ते भाजपासोबत गेले, उपमुख्यमंत्री झाले इथपर्यंत सर्व ठिक होते. मात्र, लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) महायुतीच्या जागावाटपात (Mahayuti) अजित पवार यांची ताकद अजिबात दिसत नाही. ४८ पैकी अवघ्या ४ जागांवर दादांना समाधान मानावे लागले आहे. त्यातही ४ पैकी २ घरचे आणि २ बाहेरचे अशी स्थिती आहे. याउलट शरद पवार गटाने (Sharad Pawar NCP) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) तब्बत १० जागा आतापर्यंत जाहीर करून आपण वरचढ असल्याचे दाखवून दिले आहे.

सध्या जे चार उमेदवार अजित पवार गटाचे आहेत, त्यापैकी निवडूण किती येणार, हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. कारण यावरच अजित पवार गटाची ताकद ठरणार आहे. बारामती (Baramati Lok Sabha), शिरूर (Shirur Lok Sabha) या दोन्ही ठिकाणी अजित पवार गटासाठी निवडणूक कठीण असल्याचे दिसत आहे.

महायुतीत अजित पवार यांना ज्या चार जागा मिळाल्या आहेत, त्यापैकी बारामतीमध्ये त्यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात आहेत. तर तिकडे रायगडमध्ये दादांचे निकटवर्ती नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) निवडणूक लढवत आहेत. हे दोनच उमेदवार मुळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.

शिरूरमध्ये स्वपक्षातील अनेक नेत्यांना नाराज करत अजित पवारांना शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde Shivsena) नेते आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना पक्षात घेऊन उमेदवारी द्यावी लागली आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्यातरी अमोल कोल्हे यांची बाजू प्रबळ मानली जात आहे. तर दुसरीकडे धाराशीवमध्ये (Dharashiv Lok Sabha) भाजपाचा उमेदवार (BJP) राष्ट्रवादीकडून लढत आहे.

अजित पवारांनी भाजपाच्या साथीने शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष मिळवला, पण जागावाटपात मात्र भाजपाने अजित पवारांची दादागिरी चालू दिली नसल्याचे प्रकर्षाने जाणवतेय. दोन घरचे आणि दोन बाहेरचे इतकेच त्यांना सिमीत ठेवण्यात आले आहे.

नाशिकच्या जागेवर (Nashik Lok Sabha) अजित पवारांचा गट दावा करत असला तरी तिथे शिंदेंचे खासदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. अजित पवार पक्षप्रमुख असूनही भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आपले दिल्लीत किती वजन आहे ते दाखवत आहेत. मला दिल्लीतून निरोप आला असल्याचे ते सांगत आहेत. नाशिकची जागा अजित पवार गटाला मिळते अथवा नाही हे लवकरच स्पष्ट होईल.(Sharad Pawar Vs Ajit Pawar)

एकुणच जागावाटपात जास्तीत जास्त जागा मिळवण्यात अजित पवारांना यश आल्याचे दिसत नाही.
तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही हिच स्थिती आहे, त्यांना विद्यमान १३ पैकी केवळ ७ खासदारांनाच उमेदवारी
देता आली. म्हणजेच शिंदे गटाची ताकद सुद्धा भविष्यात अजित पवार गटाप्रमाणे भविष्यात कमी होणार, हे स्पष्ट आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवराज व त्यांचा पुतण्या नयन हे त्यांच्या अ‍ॅक्टिव्हा मोपेड
(एमएच 12 व्हीके 8449) वरुन मोबाईल दुरुस्त करण्यासाठी नऱ्हे गावात जात होते.
त्यावेळी नऱ्हे-धायरी रोडवर नवले हॉस्पिटल जवळ असलेल्या डी-मार्ट आउटलेट समोर फिर्यादी यांच्या दुचाकीला
पाण्याच्या टँकरने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी फिर्यादी यांच्या दुचाकीची धडक टँकरला बसल्याने ते व पुतण्या नयन दुचाकीसह खाली पडले.

पाण्याच्या टँकरचे डाव्या बाजूचे चाक अंगावरुन व गाडीवरुन गेले. यामध्ये युवराज व नयन हे गंभीर जखमी झाले.
नयन याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
घटनेनंतर टँकर चालक घटनास्थळावरुन पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव (API Rahul Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Yerawada Crime | पुणे : पाठलाग करुन अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, तरुणावर FIR

Baramati Lok Sabha Election 2024 | मोदींना ‘मनसे’ पाठिंबा, सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंना नोटीस, चुकीचा इतिहास आणि अयोग्य धार्मिक माहिती जनमानसात पसरवली, ”शाळकरी मुलांनाही समजते ते….”