विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून दुरावलेल्या नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून दुरावलेल्या अकलूज व माळशिरस येथील काही नेत्यांनी  सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार असून माढा मतदारसंघाचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचा प्रचार जोमाने करणार असल्याबाबत सांगितले.

माढा मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे रंगलेल्या नाट्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील काही कार्यकर्ते व नेते त्यांच्यापासून दुरावलेले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माढा मतदारसंघात संजयमामा शिंदे यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, माळशिरस मार्केट कमीटीचे संचालक पांडुरंग देशमुख, हिंदूराव माने पाटील यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी माढा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच प्रचार करणार आहोत. तसेच माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजयमामा शिंदे यांच्याच पाठीशी उभे राहणार असल्याचा विश्वास त्यांनी शरद पवार यांना दिले.