Shashi Tharoor | ‘संसदेत महात्मा गांधींच्या बाजूला सावरकरांचा फोटो कशासाठी?’ शशी थरूर यांचा सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेत महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) शेजारी स्वातंत्र्यवीर सावकर (veer savarkar) यांचा फोटो कशासाठी लावला आहे, ही बाब अनेकांच्या समजण्यापलीकडे आहे, असे शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना इतिहासकार विक्रम संपत (Vikram Sampat) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांशी निगडीत अनेक गोष्टी उलगडून सांगतल्या. त्यावेळी शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. याला विक्रम संपत यांनी उत्तरे दिली.

 

शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी वीर सावरकर नेमके कोण होते, ते स्वातंत्र्यसैनिक होते, हिंदूत्ववादी नेते होते की, मुस्लिम विरोधी होते, असा सवाल उपस्थित केला. त्यावेळी इतिहासकार विक्रम संपत यांनी शशी थरूर यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. ते म्हणाले, वीर सावरकर या सर्वांचे एक मिश्रण होते. मात्र शशी थरूर यांचे समाधान न झाल्याने विक्रम संपत यांचा सावरकरांवरील अभ्यास दांडगा असून त्यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत. ती वाचायची म्हंटल तर वर्ष लोटायचे अशी मिश्लिक टिप्पणी थरूर यांनी केली.

 

महात्मा गांधींच्या शेजारी वीर सावरकरांची तसबीर कशासाठी?

स्वातंत्र्यवीर सावरकरांना राष्ट्रवादी या नात्याने पाहणारा देशात एक गट आहे आणि दुसरा आहे तो सावरकरांना इंग्रजांकडे याचिका करणारा, इंग्रजांकडून पेंशन घेणारा माणूस म्हणून पाहतो. त्यामुळे संसदेत महात्मा गांधी यांच्या शेजारी वीर सावरकर यांचा फोटो का लावला आहे, ही बाब आमच्यातील काही जणांना समजणे कठीण आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले.

 

यावर विक्रम संपत म्हणाले की, ज्या विनंती किंवा याचिकांची गोष्ट केली जाते, त्या वास्तविक सावरकर यांच्या दया याचिका नव्हत्या. तसेच पेंशनबाबत (pension) बोलायचे झाले तर ते अन्य अनेक स्वातंत्रसैनिकांना मिळत असे. ज्यांची पदवी इंग्रज सरकार काढून घेत असे. वीर सावरकर, भगत सिंग (Bhagat Singh), चंद्रशेखर आझाद (Chandrasekhar Azad), दुर्गा भाभी (Durga Bhabhi), राज बिहारी बोस (Rashbehari Bose) एकमेकांच्या संपर्कात होते असे इंग्रजांना वाटत होते. त्यामुळेच त्यांची शिक्षा पाच वर्षावरुन 13 वर्षे करण्यात आली.

दरम्यान, शशी थरूर यांनी प्रश्न उपस्थित केला.
ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 14 ऑगस्ट फाळणीचा दिवस स्मरण दिवस म्हणून मानला जाईल,
अशी घोषणा केली होती. ती आम्हाला पटली नाही. याला उत्तर देताना विक्रम संपत म्हणाले की, इतिहास लक्षात ठेवला की,
कोणत्या गोष्टींची, घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, हे माणसाच्या कायम स्मरणात राहते त्यामुळे पंतप्रधान मोदींनी योग्य गोष्ट केली आहे.
ही चांगली बाब आहे असेही त्यांनी म्हंटले.

 

Web Title :- Shashi Tharoor | shashi tharoor asked we do not understand why veer savarkar photo next mahatma gandhi parliament

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitesh Rane | नितेश राणेंची शिवसेनेवर बोचरी टीका, म्हणाले- ‘एखादा पेंग्विन कमी पाळा पण…’

Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांकडून लोणावळयातील हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दिल्लीच्या 2 मुली आढळल्या; प्रचंड खळबळ

Maharashtra Band | शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ‘महाविकास’ आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हावे – आ. वरपुडकर