शॉटगन शत्रुघ्न सिन्हांच्या पत्नीचा ‘या’ पक्षात प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणुकीच्या तोंडावरच अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. डिंपल यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. पहिल्या टप्यातील मतदान पूर्ण जाहले आहे. तर १८ एप्रिलला दुसऱ्या टप्यातील मतदान, तर २३ एप्रिलला तिसऱ्या टप्यातील आणि २९ एप्रिलला चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी डिंपल यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे, समाजवादी पक्षाने अद्यापही लखनऊ लोकसभा मतदारसंघातून उमेदवार घोषित केला नाही. तसेच भाजप कडून राजनाथ सिंह उमेदवारी लढवत आहेत. याचबरोबर काँग्रेस पक्षानेही अद्यापही आपला उमेदवार घोषित केला नाही. मात्र राजनाथ सिंह यांच्या विरोधात काँग्रेस जितिन प्रसाद यांना उमेदवारी देतील अशी शक्यता वर्तवला जात आहे. याचबरोबर आता राजनाथ सिंह यांच्याविरोधात पूनम सिन्हा यांना उमेदवारी देण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे.

१८ एप्रिल ही लखनऊ येथील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. तर ६ मी मतदानाची तारीख आहे. यामुळे सपा आणि काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Loading...
You might also like