Shevga Benefits | 1 फुट लांबीची ही गोष्ट आरोग्यासाठी अमृत, 300 आजारांमध्ये औषधापेक्षा परिणामकारक, विज्ञानाने केले मान्य

नवी दिल्ली : Shevga Benefits | त्याला अमृत म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. हे असे जादुई औषध आहे ज्याची प्रत्येक गोष्ट उपयुक्त आहे. होय, आम्ही बोलत आहोत शेवग्याच्या शेंगाविषयी. शेवग्याचे झाड (Drumstick Plant) असे आहे ज्याची प्रत्येक गोष्ट औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. (Shevga Benefits)

त्याची मुळे, पाने, फुले, शेंगा सर्व काही उपयुक्त आहे. शेवग्याची शेंग १ फूट पेक्षा जास्त लांब काटीसारखी असते. म्हणूनच तिला इंग्रजीत ड्रम स्टीक म्हणतात. आयुर्वेदात असा दावा करण्यात आला आहे की ३०० प्रकारच्या आजारांवर शेवगा वापरून उपचार केले जातात. हे सत्य विज्ञानाने देखील मान्य केले आहे. (Shevga Benefits)

ब्लड शुगरचा करते अंत

हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की शेवगामुळेहाय ब्लड शुगर कमी होते. ब्लड शुगरमुळे हार्ट डिसीजचा धोका वाढतो. पबमेड सेंट्रल जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, जेव्हा ३० महिलांना दररोज ७ ग्रॅम शेवग्याच्या पानांची पावडर दिली गेली तेव्हा ब्लड शुगर लेव्हल १३.५ टक्क्यांनी कमी झाली होती.

तसेच, ब्लड शुगरवर शेवग्याचा प्रभाव अनेक संशोधनात मोजला गेला. संशोधनानुसार, दररोज ५० ग्रॅम शेवगा पावडर ब्लड शुगर २१ टक्क्यांहून जास्त कमी करते. शेवगामधील आयसोथियोसायनेट्स कंपाऊंडमुळे ब्लड शुगर वाढत नाही, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

३०० रोगांवर गुणकारी

आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की शेवगा हे एक चमत्कारी झाड आहे जे ३०० प्रकारचे रोग बरे करू शकते. केस गळणे, मुरूम, अ‍ॅनिमिया, अर्थरायटिस, कफ, दमा यांसारखे आजार शेवग्याने बरे होतात. तसेच इम्युनिटी वाढते. शेवगामध्ये अँटीबायोटिक, अ‍ॅनालजेसिक, अँटीऑक्सिडंट, अँटी-इम्फ्लामेटेरी, अँटी कॅन्सर, अँटीडायबेटिक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात.

हे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करते. यासोबतच हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कमी करते. शेवग्याने किडनी आणि लिव्हर डिटॉक्स होते. वजन कमी करण्यासाठी शेवगा खूप लाभदायक आहे. शेवगा मेटाबॉलिज्म वाढवतो. हे थायरॉईडचे कार्य सुधारते. नवीन मातेच्या दुधाचे उत्पादन वाढवते.

रोज किती डोस आवश्यक

डॉ. दीक्षा भावसार सांगतात की, रोजच्या आहारात याचा समावेश करू शकता.
रोज शेवग्याची शेंग खाऊ शकत नसाल तर रोज एक चमचा पानांचे चूर्ण घ्या,
यामुळे अनेक आजारांपासून दूर राहाल. हे पीठात मिसळले तरी फायदा होईल. याशिवाय ते ड्रिंक किंवा स्मूदीमध्ये मिसळून पिऊ शकता. मात्र, पावडर एक चमचापेक्षा जास्त घेऊ नका.

कुणी खाऊ नये

शेवग्याचा प्रभाव उष्ण असतो. त्यामुळे शरीरात उष्णतेच्या समस्या असल्यास शेवग्याचे सेवन करू नये.
जसे, अ‍ॅसिडीटी, ब्लीडिंग, पाईल्स, हेवी पीरियड्स, मुरुम-फुटकुळ्या या
आजारांनी त्रस्त असलेल्यांनी शेवगा खाऊ नये.
शेवग्याचा रोजच्या आहारात समावेश करायचा असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला,
केसगळतीला लागेल ब्रेक

Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का? निष्काळजीपणा पडू शकतो महागात,
होऊ शकतात 5 मोठे आजार

Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो,
गॅरंटीने होतील दूर