Shilpa Shetty | राज कुंद्रानंतर आता ‘त्या’ प्रकरणात शिल्पा शेट्टीसह आई आणि बहीणीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज कुंद्राच्या प्रकरणानंतर (Raj Kundra Case) आता शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि बहीण शमिता (Shamita Shetty), आई सुनंदा शेट्टी (Sunanda Shetty) यांच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील (Mumbai) अंधेरी कोर्टाने (Andheri Court) शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी (Shilpa Shetty) आणि सुनंदा शेट्टी यांच्या विरोधात समन्स (Summons) बजावले आहे. तसेच त्यांना 28 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. हे प्रकरण 21 लाखाच्या कर्जासंदर्भात आहे.

 

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अंधेरी कोर्टाने एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर (Businessman Complaint) अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty), तिची बहीण अमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना समन्स बजावले आहे. तिघींनीही 21 लाखांचे कर्ज फेडले नसल्याचा (Loan Non-Repayment) आरोप व्यावसायिकाने केला आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने तिघींना 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

 

एका ऑटोमोबाईल्स एजन्सीच्या मालकाने (Automobile Agency Owner) या तिघींविरोधात M/s Y&A Legal या लॉ फॉर्ममार्फत 21 लाख रुपयांच्या फसवणुकीची (Cheating) तक्रार दाखल केली होती. शिल्पाच्या दिवंगत वडिलांनी 21 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज जानेवारी 2017 मध्ये व्याजासह परत करायचे होते, असा दावा तक्रारदार यांनी केला आहे.

 

तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार, शिल्पा शेट्टी, बहीण शमिता आणि आई सुनंदा यांना विडिलांनी 2015 मध्ये घेतलेले कर्ज फेडता आले नाही.
त्यांच्या वडिलांनी वार्षीक 18 टक्के व्याज दराने कर्ज घेतले होते.
त्यांनी आपल्या मुलींना आणि पत्नीला कर्जाबाबत सांगितले होते, असा दावा तक्रारदाराने केला आहे.
परंतु कर्ज फेडण्याआधीच 11 ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या तिघींनी कर्ज फेडण्यास नकार दिला.

 

Web Title :- Shilpa Shetty | andheri court issued summon to actress shilpa shetty kundra her sister shamita and mother sunanda

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा