#Video : १२ वर्षापुर्वी ‘KISS’ प्रकरणी वादात सापडली होती शिल्पा शेट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त एक मोठा खुलासा झाला आहे. तो खुलासा असा की, शिल्पा वर अशी वेळ आली. जेव्हा एका Kiss ने शिल्पाला अडचणीमध्ये आणले होते. काही वर्षापुर्वी दुनियाचा सगळ्यात सेक्सी किताब प्राप्त करणारा अमेरिकन अभिनेता रिचर्ड गेयर चित्रपटाव्यतिरिक्त एका कारणासाठी भारतात सोशल मिडियावर चर्चेत आला होता. हा अभिनेता चर्चेत येण्याचे कारण त्याचे ‘देसी प्रोजेक्ट’ नसून काहीतरी वेगळेच होते.

२००७ मध्ये रिचर्ड गेयरने शिल्पा शेट्टीला Kiss केले होते. यानंतर रिचर्ड गेयरला भारतातील लोक ओळखू लागले. २००७ मध्ये एड्स जनजागृतीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात त्यावेळी शिल्पा आणि रिचर्ड कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे होते. जेव्हा शिल्पा रिचर्डला मंचावर घेऊन आली. त्या मंचावर असा किस्सा घडला होता ज्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता.

याबाबतीत दोघांवरही खूप टिका केली गेली. यानंतर रिचर्डने माफी देखील मागितली होती. त्यावेळी वृत्तसंस्थेचे छापलेल्या माहितीनुसार तेव्हाची परिस्थिती इतकी गंभीर झाली की, राजस्थानमधील एका स्थानिक न्यायालयात शिल्पा आणि रिचर्ड विरुद्ध अटकेचा आदेश करण्यात आला होता.

शिल्पाच्या करिअरमध्ये अशी वेळ आली जेव्हा तिला वाटले की, आपण खूप मागे पडत आहोत. त्यावेळी २००७ मध्ये ब्रिटनमध्ये होणाऱ्या रियालिटी शो ‘बिग ब्रदर’ मध्ये ती पोहचली. तिथे तिच्यावर जेड गुडीने टिका केली. त्याचा परिणाम असा झाला की, जेड गुडीवर ही टिका होऊ लागल्या आणि कार्यक्रमची विजेती शिल्पा झाली. शिल्पा शेट्टी विजय मिळवणारी पहिली भारतीय बनली होती. त्यावेळी तिने पुन्हा एकदा गमवलेला आत्मविश्वास मिळवला. यांनतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही.