‘सिद्धार्थ शुक्ला मारायचा, अ‍ॅसिड फेकण्याची धमकी द्यायचा’, शिल्पा शिंदेचा खळबळजनक ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामाम ऑनलाईन – बिग बॉस 13 ची विनर शिल्पा शिंदेनं या सीजनच्या फिनाले आधी अनेक खुलासे करत सिद्धार्थ शुक्लावर गंभीर आरोप केले होते. तिनं सिद्धार्थसोबत नात्यात असल्याचंही सांगितलं होतं. सिद्धार्थ तिला शिवीगाळ करत मारहाण करतो असंही ती म्हणाली होती. शिल्पानं सिद्धार्थसोबतची एक ऑडिओ क्लीपही लीक केली होती ज्यात तो वाईट साईट बोलताना दिसला.

https://www.instagram.com/p/B4cgVGChPYL/

सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस 13 चा विनर झाल्यानंतर आता शिल्पानं आणखीच धक्कादायक खुलासे केले आहेत. शिल्पानं एका मुलाखतीत सांगितलं आहे की, सिद्धार्थनं तिच्यावर अ‍ॅसिड फेकण्याचीही धमकी दिली होती.

शिल्पा शिंदे म्हणाली होती, “होय, मी सिद्धार्थसोबत रिलेशनमध्ये होते. परंतु तो अनेकदा लहान लहान गोष्टींवरून नाराज होत असे. राागाच्या भरात त्यानं शिवीगाळही केली आहे. इतकेच नाही तर मला त्यानं मारहाणही केली आहे. तो खूप पजेसिव होता त्यामुळेच तो मला नेहमी मारहाण करायचा. परंतु जेव्हा त्याचा फोन बंद असायचा तेव्हा मी जर काही प्रश्न केले तर समोरून 4 थप्पड पडत होते. शिव्या ऐकायला यायच्या. जेवढं काही वाईट असेल तर ते हेच होतं.”

https://www.instagram.com/p/B4YzWNmh8HI/

पुढे शिल्पा म्हणाली, “मी गप्प बसले नाही. मी पोलिसात तक्रार दाखल केली. कारण तो मला म्हणाला होता, मला सोडून तर दाखव तुझ्या तोंडावर अॅसिड फेकेन. मी तुला बरबाद करेन. खूप व्हायोलिंस झाला होता, माराहणही झाली होती. मी सिद्धार्थच्या आईला म्हटलं होतं की, मी हे प्रकरण खूप पुढे घेऊन जाणार आहे. मी कोणालाही घाबरत नाही. थोडीही लाज वाटत असेल त्याला समजावून सांगा.”

https://www.instagram.com/p/B3UWU5nhqfi/

शिल्पाला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, तिनं हे सगळं फिनालेच्या आधीच का सांगितलं ? यावर ती म्हणाली, “मला नव्हतं वाटत की, सिद्धार्थ सारख्या माणसानं बिग बॉस 13 जिंकावं आणि एका डिजर्विंग माणूसाची हार व्हावी.”

https://www.instagram.com/p/B3M0R0qBF82/

शिल्पा असंही म्हणाली, मेकर्स आणि बिग बॉसची क्रिएटीव टीम सिद्धार्थ सारख्या माणसाला जिंकवत असेल तर ती तिची बिग बॉस 11 ची ट्रॉफी परत करायला तयार आहे.

https://www.instagram.com/p/B3J6owvBx1l/

शिल्पानं केलेल्या या खळबळजनक आरोपांवर सिद्धार्थ शुक्लाची कोणताीही प्रतिक्रिया आलेली नाही. सिद्धार्थचं नाव अनेक टीव्ही अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे.

https://www.instagram.com/p/B1pxK9Kh2zy/

https://www.instagram.com/p/B2eIysPhSBL/

https://www.instagram.com/p/B1twl8Qhki2/