Shinde Fadnavis Government | ठाकरे सरकारने केलेल्या औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारची स्थगिती, पुन्हा नव्याने निर्णय घेणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shinde Fadnavis Government | ठाकरे सरकारने (Thackeray Government) शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला एकनाथ शिंदे सरकारने (Shinde Fadnavis Government) स्थगिती दिली आहे. औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर (Sambhajinagar) तर उस्मानाबादचे (Osmanabad) धाराशिव (Dharashiv) तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai International Airport) दि. बा. पाटील (D.B. Patil) असं नामांतर (Renaming) करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी (Majority Test) सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत एकनाथ शिंदे सरकारने (Eknath Shinde Government) नामांतराला स्थगिती दिली आहे. यापूर्वी हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्षेप घेतला होता. हे तीनही नामांतराचे निर्णय सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

ठाकरे सरकार कोसळण्यापूर्वी 29 जून रोजी ठाकरे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली.
या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती.
या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात उपस्थित होते.

 

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतर अवैध असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
नामांतराचा घाईत घेतलेला निर्णय चुकल्याचं फडणवीस यांनी सांगितले होते.
बहुमत चाचणीची सूचना असताना नामांतराचे ठराव मंजूर करण्यात आले, त्यामुळे नव्याने हे ठराव घेण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते.
त्यानंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे सरकार (Shinde Fadnavis Government) स्थापन झाले.
शिंदे सरकारने ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय स्थगित केले.

 

Web Title :- eknath shinde devendra fadnavis government stays renaming of aurangabad as sambhajinagar and osmanabad as dharashiv decision taken by uddhav thackeray government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा