Shinde Fadnavis Government | शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! पर्यटन विभागाच्या 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांना स्थगिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shinde Fadnavis Government | तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पर्यटन विभागाच्या (Department of Tourism) 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांना स्थगिती देण्याचा मोठा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Government) घेतला आहे. त्यामुळे जुन्या सरकारला एकापाठोपाठ एक धक्के दिले जात आहेत.

 

यापुर्वी सामाजिक न्याय विभागाची 600 कोटी रुपयांची विकासकामांना, दलित-आदिवासी समाजाच्या 1200 कोटी रुपयांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासकामांना स्थगिती दिली गेली आहे. त्यानंतर आता पर्यटन विभागाच्या विकासकामांना सरकारकडून दणका देण्यात आला आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी ॲडव्हेंचर टुरिझमचे धोरण आघाडी सरकारच्या काळात आणले होते.
त्याचबरोबर कॅरव्हॅन धोरण आणि साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली.
कोरोना महामारी नंतर हळूहळू पर्यटनाला चालना मिळू लागली आहे.
त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते. तसेच, रोजगारही उपलब्ध होत आहे.
पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत.
अशात पर्यटन विभागाच्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे.

 

Web Title :- Shinde Fadnavis Government | maharashtra mumbai eknath shinde and devendra fadnavis
government suspension of 59 thousand 610 crore development works of tourism department

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा