Shinde Fadnavis Government | पूजा चव्हाणच्या आजीने शिंदे सरकारविरोधात व्यक्त केला संताप; म्हणाल्या – ‘संजय राठोडांची आरती करा म्हणजे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Government) पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणातील (Pooja Chavan Suicide Case) वादग्रस्त आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याने राज्यात मोठे संतापाचे वातावरण आहे. विरोधी पक्षांनी राज्य सरकारला यावरून धारेवर धरले आहे. शिवाय, भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील राठोड यांना मंत्रिपद दिल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत, हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आता, खुद्द मृत पूजा चव्हाणच्या आजीने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केल्याने सरकार समोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. (Shinde Fadnavis Government)

 

दरम्यान, संजय राठोड यांना मंत्रिपदाची ताकद मिळताच त्यांनी विरोध करणार्‍यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्याने त्यांच्याविरोधात वातावरण आणखीच बिघडले आहे. आता मृत पूजा चव्हाणच्या आजीने सरकार विरोधात संताप व्यक्त करत म्हटले की, या सरकारने संजय राठोडची आरती करावी म्हणजे त्यांना चांगले वाटेल. पूजाच्या आजीने अशा कठोर शब्दात सरकारचे वाभाडे काढल्याने शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत आले आहे. (Shinde Fadnavis Government)

 

मृत पूजा चव्हाणची आजी शांताबाई राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, आम्हाला अशी अपेक्षा होती की या पक्षाकडून खरोखरच पूजा चव्हाणला न्याय मिळेल. मात्र जो मंत्रिमंडळाचा काल शपथविधी झाला तो पाहून असे वाटत नाही. ज्या पक्षाने त्याला वाचवले आणि मंत्री म्हणून स्थान दिले हे दुर्दैवी आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हा निर्णय अपमानास्पद आहे, असे म्हणत शांताबाई राठोड यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला.

मृत पूजाच्या आजी शांताबाई म्हणाल्या, खरे तर एका मुलीची अब्रू काढून गर्भपात करुन तिचा खून केला जातो.
स्पष्टपणे संजय राठोड म्हणतात की हे कर ते कर. एवढे ऐकूनसुद्धा संजय राठोड पहिल्या रांगेमध्ये बसतो.
आरती करावी त्याची या शिंदे-फडणवीस सरकारने. त्याची पूजा करा म्हणजे तुम्हाला चांगले वाटेल.

 

पूजाची आजी पुढे म्हणाली की, संजय राठोडला मंत्रीपद देण्याचा निर्णय महिलांचा अपमानच आहे.
महिलांना 50 टक्के आरक्षण असून पूजा चव्हाणला न्याय मिळत नाही.
पोलीस तुमचे आहेत. ते क्लीन चीट देऊ शकतात पण जनता देणार नाही. तो गुन्हेगार आहे आणि शेवटपर्यंत गुन्हेगार राहणार.
तो खुनी आहे खुनीच राहणार.

 

शांताबाई म्हणाल्या, पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.
शेवटपर्यंत पूजासाठी आमचा लढा असाच सुरु राहील.

 

Web Title : –  Shinde Fadnavis Government | pooja chavan grandmother slams shinde government over inclusion of sanjay rathod maharashtra cabinet expansion

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा