Coronavirus : शिरूरमध्ये एकाच दिवशी 13 अन् तालुक्यात 12 असे एकुण 25 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

शिरूर : प्रतिनिधी –  शिरूर शहरात एकाच दिवशी १३ रूग्णांचे तर तालुक्यात १२ रूग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेंद्र शिंदे यांनी दिली.एकाच दिवशी शहरात तेरा तर तालुक्यात १२ रूग्ण बाधित आढळुन आल्याने शहरवासियांसह तालुक्यात चिंता वाढली असुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चाैकट

मंगळवार दि.१४ रोजी शिरूर शहर व तालुक्यातील ६३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.त्याचा अहवाल बुधवार दि.१५ रोजी आला असुन त्यातील ११ तसेच इतर दोन असे १३ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.शहरातील कुंभार आळीतील बाधित महिलेच्या संपर्कातील सहा,बीजे काॅर्नर तीन,कामाठीपुरा एक,हुडको काॅलणी एक,काॅलेज रोड एक व डंबेनाला एक अशा तेरा जणांचे अहवाल बाधित आले असुन त्यात एका लहान मुलाचाही समावेश असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील यांनी दिली.

चाैकट

शिरूर तालुक्यातील करंदी १,शिरूर ग्रामीण १,उरळगाव ४,शिक्रापुर १,कासारी २,कारेगाव १,रांजणगाव १ व आमदाबाद १ असे तालुक्यात १२ रूग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेंद्र शिंदे यांनी दिली.

एकाच दिवशी शहरातील १३ व तालुक्यातील १२ असे २५ जणांचे अहवाल बाधित आल्याने शहरवासियांसह तालुक्यात चिंता वाढली असुन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने नियम मोडणा-यांची कुठल्याप्रकारची गय न करता कडक अंमलबजावणी करून कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधुन बोलुन दाखवले जात आहे.