महसुलच्या हातावर तुरी देऊन पळवली वाळूची गाडी, पुन्हा एकदा भोगळ कारभार चव्हाटयावर, FIR दाखल

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन (सचिन धुमाळ) –  शिरूर तालुक्‍यात गेल्या काही दिवसापासून महसूल विभाग मोठा चर्चेत आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या ताब्यातील चार गाड्या चोरीला गेल्या तर कालच शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये उभ्या असलेल्या वाळूच्या गाडीत राञीत क्रश सॅण्ड आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा महसूल विभागाच्या हातावर तुरी देत वाळू माफियांने गाडी पळून नेल्याचा प्रकरण समोर आला आहे.

याबाबतीत मिळालेल्या माहिती नुसार काल रात्री उशिरा महसूल विभागाच्या वतीने शिरूर तालुक्यात जागोजागी वाळू माफियावर कारवाई करण्यात आली .यावेळी कारेगाव परिसरात एक गाडी ताब्यात घेत रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये लावण्यात आले. तर मांडवगण फराटा परिसरात पकडलेल्या तीन वाळूच्या गाड्या ताब्यात घेउन शिरुर पोलीस स्टेशनला लावण्यासाठी घेऊन जात असताना एका गाडी चालकाने कुरुळी परिसरात गाडी अंगावर घालण्याची धमकी देत महसूल विभागाच्या हातावर तुरी देत पळून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत महसुलचे नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे यांच्या कडून काही तासानंतर शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सर्व बाबीमुळे शिरूर तालुक्‍यात महसूल विभागाच्या कामगिरीवर एकामागून एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.त्यातचआता राञी कारवाई साठी गेलेला महासुल विभाग अपुरे मनुष्यबळ घेऊन कारवाईसाठी का गेला ?हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे .एकूणच काय तर शिरुर तालुक्यात महसूल विभागाच्या कामगिरीवर मोठे प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आता महसुल विभागाच्या कारभाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.याबाबत आमदार अशोक पवार यांनी सांगितले की हे चाललेले प्रकार कुठेतरी थांबले पाहिजे.या साठी मी जिल्हाधिकारांकडे पाठपुरावा सुरु केला आहे.