‘शिरूर-हवेली’चा आगामी आमदार भाजपचाच : जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिरूर-हवेलीचा आमदार भाजपाचा असेल, फक्त मताधिक्याने निवडून देण्यासाठी कार्यर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पुणे जिल्ह्यातील न्हावरे येथे केले. गणेश भेगडे गाव भेटीचा दौरा करत असून या दौऱ्या दरम्यान जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

भेगडे पुढे म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या विकास कामांचा झंझावत सुरु आहे. शिरुर हवेली मतदारसंघातील आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या सततच्या शासनदरबारी पाठपुराव्यामुळे तीन हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील तळागाळातील सर्वसामान्य जनता राज्यातील सत्ताधारी व तालुक्यातील आमदार पाचर्णे यांच्याविषयी सकारात्मक आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत शिरुर हवेलीचा आमदार भाजपाचा असेल त्यासाठी सर्वांनी कामाला लागले पाहिजे. तसेच कोणीही गाफील राहून नये असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आमदार बाबूराव पाचर्णे, भाजपा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दादापाटील फराटे, उपाध्यक्ष सुभाष कांडगे, तालुकाध्यक्ष भगवान शेळके, युवक जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, उपाध्यक्ष दिनेश दरेकर, शहाजी जाधव, अरुण तांबे, दिपक कोकडे, नितीन खंडागळे, नागेश निंबाळकर, शहाजी निंबाळकर, किसन बिडगर, किरण नवले, दत्तोबा शेंडगे, संजय शेळके आदी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त