Shirur Lok Sabha | दिलीप वळसे-पाटलांची प्रकृती उत्तम, आता शिरूरच्या प्रचारात होणार सक्रिय, 20 वर्षांनंतर दोन मित्र येणार एकत्र

ADV

पिंपरी : Shirur Lok Sabha | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे काही दिवसांपूर्वी घरात पाय घसरून पडल्याने रूग्णालयात उपचार घेत होते. मात्र, आता वळसे यांची प्रकृती ठणठणीत झाली असून ते लवकरच प्रचारात सक्रिय होणार आहेत, अशी माहिती त्यांनीच दिली आहे. शिरूरमध्ये आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यासाठी दिलीप वळसे पाटील हे प्रचार करणार आहेत. यानिमित्ताने हे दोघे मित्र वीस वर्षांनंतर एकत्र येत आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या विजयासाठी वळसे-पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता ते आढळराव यांच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. यामुळे अमोल कोल्हे यांच्या अडचणी वाढू शकतात.

दिलीप वळसे-पाटील आणि शिवाजीराव आढळराव-पाटील हे जवळचे मित्र होते. वळसे-पाटील यांनी आढळरावांना आंबेगावच्या राजकारणात आणले. यानंतर त्यांना भीमाशंकर कारखान्याचे (Bhimashankar Sugar Factory Pune) अध्यक्ष केले.

२००४ मध्ये आढळराव यांनी खासदार होण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हा वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांना देण्यास विरोध केला. त्यावरून दोघांमध्ये राजकीय मतभेद निर्माण झाले. त्यामुळे आढळराव यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून ते जिंकून आले. (Shirur Lok Sabha)

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करण्याची मोठी कामगिरी आढळराव यांनी केली होती.
यामुळे वळसे-पाटील यांना मंत्रिपदही गमवावे लागले होते.
त्यानंतर वळसे आणि आढळराव यांच्यातील राजकीय संघर्ष वाढत गेला.
मात्र, लोकसभेला आढळराव आणि विधानसभेला पाटील निवडून येत होते.

आता दोघे महायुतीत असल्याने या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिलीप वळसे पाटील आणि
आढळराव पाटील एकत्र येत आहेत. वळसे यांनी देखील लवकरच प्रचारात सक्रिय होणार असल्याचे म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adv Ujjwal Nikam | भाजपाचे धक्कातंत्र! ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

Murlidhar Mohol | पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पर्वती विधानसभेतील रॅलीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

Cheating Fraud Case Pimpri Chinchwad | पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करुन व्यावसायिकाची फसवणूक, सांगवी पोलिसांकडून तरुणाला अटक