शिरूर तहसिलच्यावतीने हरिता ग्रामर कंपनीच्या सहकार्याने 65 गरजु नाभिक बांधवांच्या कुटुंबाना अन्न धान्याच्या किटचे वाटप

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू असुन व्यवसाय बंद असल्याने हातावरील पोट असलेल्या व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाभिक समाजाचे ही या लॉकडाऊन काळात दुकाने बंद असल्याने अर्थिक अडचणींचा सामना करत प्रशासनाच्या नियमांचे पालन करत आहे. शिरूर शहरातील नाभिक समाजाची परिस्थिती लक्षात घेऊन शिरूर तहसिलच्यावतीने हरिता ग्रामर कंपनीच्या सहकार्याने शहरातील ६५ गरजु नाभिक बांधवांच्या कुटुंबाना अन्न धान्याच्या किटचे वाटप तहसिलदार लैला शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

https://twitter.com/30Kumaar/status/1253733136497868800

लॉकडाऊन सुरू असल्याने सध्या गेले एक महिन्यांपासुन व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाच्या गरजा भागविताना नाभिक समाज हा आर्थिक अडचणीत सापडला असुन शहरातील नाभिक बांधवांना सध्याच्या परिस्थितीत तहसिल प्रशासनाच्यावतीने मदत करण्याची मागणी शिरूर शहर नाभिक संघटनेचे सुरज ( बंडु ) क्षिरसागर यांनी मंगळवार दि. १४ रोजी केली होती.हि बाब लक्षात घेऊन शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संतोष शिंदे यांनी सदर बाब शिरूरच्या तहसिलदार लैला शेख मॅडम यांच्या निदर्शनास आणुन देत शहरातील गरजु नाभिक बांधवांना तहसिल प्रशासनाच्यावतीने अन्नधान्याची मदत करण्याबाबतची मागणी केली.

सदर मागणीची तहसिलदार मॅडम यांनी तत्काळ दखल घेऊन मंडल अधिकारी निलेश घोडके व तलाठी विजय बेंडभर यांना शहरातील सुमारे ६५ गरजु नाभिक बांधवांच्या कुटंबांना मदत करण्याबाबतची सुचना केली.या कामी रांजणगाव ता.शिरूर औद्योगिक वसाहतीतील हरिता ग्रामर कंपनीचे विशेष सहकार्याने बुधवार दि. २२ रोजी तहसिलदार शेख यांच्या हस्ते नाभिक बांधवांना अन्नधान्याचे किटचे वाटप करण्यात आले.

https://twitter.com/30Kumaar/status/1253733442400980992

यावेळी हरिता ग्रामरचे सुपरवाझर काळुराम अभंग,शिरूर शहर नाभिक संघटनेचे शहराध्यक्ष निलेश भोसले,माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड,माजी उपाध्यक्ष गणेश शिंदे,अनिल रायकर,निलेश गायकवाड,संतोष वाघमारे,प्रितेश फुलडाहळे,गोरख गायकवाड यांसह नाभिक बांधव उपस्थित होते.यावेळी प्रशासनाच्यावतीने मिळालेल्या या मदतीबद्दल नाभिक बांधवांनी तहसिल प्रशासन व हरिता ग्रामर कंपनीचे आभार मानत समाधान व्यक्त केले.