Pune : खेड पं.स. चे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकरसह दोघांना अटक; सहकारी महिलांसह इतरांवर केला होता लोखंडी रॉडने हल्ला अन् हवेत गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अविश्वास ठराव दाखल केल्याने चिडलेल्या खेड तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर Bhagwan Pokharkar यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर लोखंडी रॉडने हल्ला करुन गोळीबार केल्याची घटना घडली होती. ही घटना डोणजे गावातील वाईल्डर नेक्स हॉटेल येथे गुरुवारी (दि.27) पहाटे पाचच्या सुमारास घडली होती. याप्रकरणातील मुख्य आरोपी भगवान पोखरकर Bhagwan Pokharkar आणि केशव आरगडे यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

याप्रकरणी प्रसाद दशरथ काळे (रा. गोलेगाव, ता. खेड) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी सभापती भगवान नारायण पोखरकर, जालिंदर नारायण पोखरकर, केशव आरगडे व इतर 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी प्रकाश उर्फ पप्पू मारुती पोखरकर (रा. वाळज, ता. खेड) याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आरोपी भगवान पोखरकर आणि केशव आरगडे हे घटना घडल्यानंतर फरार झाले होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोखरकर आणि आरगडे यांचा शोध घेत होते. त्यावेळी सभापती भगवान पोखरकर व केशव आरगडे हे शिवाजीनगर येथील मंगला टॉकीज भागात येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगला टॉकीज परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपींना हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपींकडे केलेल्या प्रथमिक चौकशीत, खेड पंचायत समिती निवडणूक 4 वर्षापूर्वी झाली असून एकूण 14 पंचायत समिती सदस्य आहेत. पंचायत समितीवरील आरोपी सभापती याचे सभपती पदाची मुदत इतर पंचायत समिती सदस्यांनी ठरविल्यानुसार संपली आहे. मात्र, तरीही तो राजीनामा देत नसल्याने 24 मे रोजी सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वसाचा ठराव दाखल केला. यावर खेड प्रांत यांना सूचना देऊन त्यांचे समोर 31 मे रोजी बहुमत सुनावणी होणार होती. याचा राग आल्याने भगवान पोखरकर व त्यांच्या इतर 15 ते 20 साथीदरांनी डोणजे गावातील वाईल्डर नेक्स हॉटेलमध्ये तीन ते चार गाड्यांमधून आले. त्यांनी पक्षाच्या महिला व पुरुष सदस्यांना काठीने व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच दहशत पसरवण्यासाठी पिस्टल काढून हवेत गोळीबार करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, पोलीस हवालदार सचिन गायकवाड, पोलीस नाईक गुरु जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेडगे, मंगेश भगत, अक्षय नवले, प्रसन्नजीत घाडगे महिला पोलीस कॉन्स्टेबल पुनम गुंड, पोलीस हवालदार काशिनाथ राजापूरे, पोलीस हवालदार मुकुंद कदम यांच्या पथकाने केली.

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय