Shiv Sena Chief Uddhav Thackeray | ‘गणपती बाप्पाच्या आगमनाआधी…’, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  शिवसंवाद यात्रेच्या (Shiv Samvad Yatra) माध्यमातून पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. आज उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी शिवडी विधानसभा मतदार (Shivdi Assembly Constituency) संघातील शिवसेना शाखेच्या उद्घटन कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना बंडखोर आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला. तसेच गणपती बाप्पाकडे (Ganapati Bappa) साकडं घातलं.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना संपली असं म्हणणाऱ्यांनी जरा एकदा इथं पाहावं. आज इथं उपस्थित असलेले कार्यकर्ते माझी ताकद आहे. वर्षावरुन निघालो असलो तरी मातोश्रीत (Matoshree) परतल्यानंतर मला माझी खरी ताकद मिळाली आहे. शिवसैनिक ही माझी खरी ताकद आहे. आज अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी गणपती बाप्पाची मुर्ती भेट म्हणून दिली. गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे. मी गणरायाकडे साकडं घालतोय की तुझ्या आगमनाआधी हे संकट आणि आरिष्ट्य मोडून शिवसेनेचा भगवा पुन्हा महाराष्ट्रावर फडकू देत. आता खरा भगवा कोणता हे दाखवण्याची वेळ आली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, शिवसेनेची ताकद काय आहे हे आता जगाला समजू द्या. मझ्या वाढदिवसाला मला पुष्पगुच्छ भेट म्हणून नकोत.
तुमच्या सह्यांचे शपथपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे माझ्याकडून आले पाहिजेत. हेच माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट मी समजेन,
असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

 

Web Title :- Shiv Sena Chief Uddhav Thackeray | before the arrival of ganapati bappa uddhav thackeray suggestive statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravi Rana | ‘उद्धव ठाकरेंचं उरलेलं अस्तित्वही…’; रवि राणांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

 

Stock Market | Reliance चे गुंतवणुकदार झाले मालामाल, एका आठवड्यात इतक्या कोटीचा झाला फायदा

 

Chandrakant Patil’s Mother Passed Away | चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर, संघर्ष करायला शिवकवणारे मायेचे छत्र हरपले