Chandrakant Patil’s Mother Passed Away | चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर, संघर्ष करायला शिवकवणारे मायेचे छत्र हरपले

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil’s Mother Passed Away | भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील (Saraswati Bachu Patil) यांचे निधन झाले आहे. कोल्हापूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 91 वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाने (Chandrakant Patils Mother Passed Away) पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कष्टाला कमी पडू नकोस, आयुष्यात तुला काही कमी पडणार नाही, अशी शिकवण चंद्रकांतदादांना त्यांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांनी कायम दिली. त्यांनी दिलेली शिकवण चंद्रकांतदादांनी अंगीकारली. कठीण परिस्थितीत संघर्ष करायला शिकवण देणारे मायेचे छत्र हरपल्याने त्यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे.

 

पार्थिव देहावर आज (दि. 24) रात्री 8.30 वा कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी (Panchganga Crematorium) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आईंनी सर्व मुलांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवर पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहे, असे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी म्हटले.

 

Web Title :- Chandrakant Patil’s Mother Passed Away | Chandrakant Patil’s Mother Saraswati Bachu Patil Passed Away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Smriti Irani | ‘बार’वरून स्मृती इराणींच्या वकिलाने काँग्रेसला पाठविली कायदेशीर नोटीस

 

Sandipan Bhumare | ‘शहाणपणा करु नको, तू ये मग दाखवतो’ ! संदिपान भुमरे आणि शिवसैनिकाची Audio Clip व्हायरल

 

MTNL Prepaid Plan | अवघ्या 47 रुपयात 90 दिवसापर्यंत चालू राहील सिम, सोबत मिळतील 500 SMS, पहात राहीले Jio-Airtel-Vi!