शिवसेना नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा

नवी मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन
तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेनेच्या एका नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, नामदेव भगत असे त्याचे नाव आहे. 19 वर्षीय तरुणीने या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरु नगरसेवक भगत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नामदेव भगत हे नवी मुंबईमधील नेरुळमधून शिवसेनेचे नगरसेवक आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेत सध्या स्थायी समिती सदस्य आहेत. यापुर्वी त्यांनी सिडकोचे संचालक पद देखील सांभाळले आहे.
[amazon_link asins=’1612680194′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’61bbf9a9-a517-11e8-9244-117e927c78d7′]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नामदेव भगत यांची कामानिमित्त भेट घेण्यासाठी आपण उरण तालुक्यात असलेल्या दिघोडेमधील फार्म हाऊसवर गेलो होतो. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी विनयभंग केल्याचा आरोप 19 वर्षीय तक्रारदार तरुणीने केला आहे. उरण पोलिसांनी नामदेव भगत यांच्याविरोधात कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत.