Shiv Sena Dasara Melava | शिवतिर्थावर उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचा मेळावा? शिंदे गटाच्या नेत्याने दिले संकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shiv Sena Dasara Melava | शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मागीलवर्षीपासून दादर येथील शिवतिर्थावर (Shivtirth Dadar) दसरा मेळावा कोणाचा? यावरून सलग दुसर्‍यावर्षी दोन्ही गटांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाने मागीलवर्षी प्रमाणेच यंदाही ‘बीकेसी’तील मैदानाची (BKC Ground) चाचपणी सुरू केल्याची माहिती एका नेत्याने दिल्याने संघर्ष टळेल अशी चिन्हे दिसत आहेत. (Shiv Sena Dasara Melava)

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये मागीलवर्षी जूनमध्ये फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा एक गट भाजपसोबत सत्तेत सहभागी होत शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर दोन्ही गटांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होत गेल्याचे पाहायला मिळाले. अशातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत दादर येथील शिवतिर्थावर होणारा दसरा मेळावा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात तेथेच होत राहीला. मात्र, मागीलवर्षी फुटीनंतर शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच असून शिवतिर्थावर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही परंपरेने याच ठिकाणी आम्ही मेळावा घेणार असल्याचा अर्ज त्या अगोदरच दाखल करून मागीलवर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवतिर्थ मिळविण्यात यश मिळविले. शिंदे गटाने बीकेसीतील मैदानावर मेळाव्याचे आयोजन केले होते. (Shiv Sena Dasara Melava)

लवकरच लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) होत असल्याने शेवटच्या टप्प्यात होणार्‍या
दसरा मेळाव्यासाठी शिवतिर्थ मिळावे यासाठी यावर्षी पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून बीएमसीकडे
अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, पुणे भेटीवर असलेल्या शिंदे गटाच्या नेत्याकडे ‘शिवतिर्थ’ वर कोणाला परवानगी मिळणार? याबाबत विचारणा केली असता. त्यांनी मागील वर्षी आम्ही संघर्ष टाळला असे सांगतानाच आम्ही बीकेसीच्या मैदानाची चाचपणी करत असल्याचे सांगितले. त्यामुळे यंदाही शिवतिर्थावर उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली दसरा मेळावा होणार याचे संकेत मिळत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar-Chhagan Bhujbal | ओबीसी बैठकीतील अजित पवारांसोबतच्या वादावर भुजबळांचे स्पष्टीकरण, ”एका घरात…”

Sudhir Mungantiwar | भाजपा राज्यातले मंत्री आणि आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार?

Vijay Wadettiwar On Ambadas Danve | ‘दानवे मराठा तरीही त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र’ – विजय वडेट्टीवार

Dog Bites Cases In Pune | पुण्यात आठ महिन्यांत तब्बल १४ हजार श्वानदंश, सुदैवाने एकालाही रेबीज नाही