Shiv Sena MP Sanjay Raut On BJP | बेरोजगारी, महागाई यावर सरकारकडे एकच उपाय…धर्म, संजय राऊतांचे भाजपावर टीकास्त्र

MP Sanjay Raut | sanjay rauts reaction on the thackeray group bjp alliance
file photo

मुंबई : Shiv Sena MP Sanjay Raut On BJP | आत्ताचे राज्यकर्ते देशाला पाच हजार वर्ष मागे घेवून जात आहेत. त्यामुळेच देशात दहा वर्षापासून बेरोजगारी (Unemployment) वाढत आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, महागाई वाढत आहे. यावर सरकारकडे एकच उपाय, तो म्हणजे धर्म (Religion). पण धर्माच्या आधारावर कोणताही देश उभा राहू शकत नाही आणि लोकशाही टिकू शकत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपा (Shiv Sena MP Sanjay Raut On BJP) वर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शिर्डी येथील शिबिरात बोलताना शरद पवार यांनी, देशाला पुढे नेण्यासाठी नेहरूंच्या विचारधारेची आवश्यकता आहे, असे म्हटले होते, यावर आज संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) यांनी नेहरूंच्या विचारधारेबाबत केलेले वक्तव्य सत्य आहे. देश ५००० वर्ष मागे घेऊन जाण्याचा कुणी प्रयत्न केला तर देश राहणार नाही, जंगल कायदा सुरू होईल. नेहरूंपासून पुढील ५० वर्ष या देशामध्ये विज्ञान, शिक्षण, अंतराळात प्रगती केली. उद्योग क्षेत्रात झेप घेतली. कारण त्यांनी देशाला आधुनिकतेचा मार्ग दाखवला. संशोधनासाठी त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या.

देशातील न्यायव्यवस्थेवर बोलताना संजय राऊत म्हणाले, निवडणूक आयोग (Election Commission) घटनाबाह्य
सरकारला अप्रत्यक्ष पाठिंबा देत आहे. हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. देशात सत्याचा विजय होतो, म्हणजे अदाणीचा विजय होतो.
हिंडेनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) जो निकाल दिला, त्याबाबत टिप्पणी करायची नाही. कारण आजतरी न्यायालयाचा निकाल खाली मान घालून मान्य करण्याची प्रथा आहे. या निकालानंतर अदाणी म्हणाले, सत्याचा विजय झाला. ज्या प्रकरणात संसद चालली नाही, लोक रस्त्यावर उतरले, सत्य बाहेर आले नाही, उलट त्यांना क्लीनचीट मिळाली मग हे सत्य इतरांच्या बाबतीत कुठल्या बिळात लपवले जाते? (Shiv Sena MP Sanjay Raut On BJP)

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्या विरोधात जनता न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहे.
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश देऊनही विधिमंडळाचे अध्यक्ष निर्णय घेत नाहीत.
अशा वेळी जो न्याय अदाणी यांना मिळतो, तो न्याय देशातील नागरिकांना का मिळत नाही? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

संजय राऊत म्हणाले, या देशातील १३८ कोटी जनता आजही संघर्ष करतेय. मूठभर लोकांकडेच पैसे आहेत.
१०० उद्योगपतींची २६ लाख कोटींची कर्ज माफ होतात. तर शेतकरी दोन-पाच हजाराच्या कर्जामुळे आत्महत्या करतो.
अदाणींची श्रीमंती ही भाजपाची श्रीमंती आहे. ती देशाची श्रीमंती नाही. धारावी, वरळी मीठागृहे, देशातील बंदरे
आणि सार्वजनिक मालमत्ता एकाच उद्योगपतीला दिल्यानंतर तो श्रीमंत होणारच.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | मोठी बातमी! ‘बारामती अ‍ॅग्रो’वर ईडीची धाड, आमदार रोहित पवार अडचणीत

जमीन देण्याच्या बहाण्याने 21 लाखांची फसवणूक, खराडी परिसरातील प्रकार

Firing On Sharad Mohol In Kothrud Pune | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात गोळीबार, एक गोळी लागल्याची प्राथमिक माहिती

पुणे: तीन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची दीड कोटींची फसवणूक, तिघांवर FIR

Total
0
Shares
Related Posts