Shiv Sena | ठाकरेंकडून शिवसेना भवनही जाणार? शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार, खासदार यांच्यानंतर शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) गेल्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अडचणीत सापडले आहेत. यानंतर विधिमंडळातील पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने ताबा घेतला. यातच आता ठाकरेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. शिवाई ट्रस्ट (Shivai Trust) विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे (Charity Commissioner) तक्रार दाखल करण्यात आली आहे. ट्रस्टच्या मालमत्तेचा राजकीय वापर केल्याचा आरोप योगेश देशपांडे यांनी तक्रारीत केला आहे. शिवाई पब्लिक ट्रस्ट असताना एखाद्या पक्षाला कशी दिली? एखादा राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरू दिली? असा सवाल योगेश देशपांडे (Yogesh Deshpande) यांनी तक्रारीत केला आहे. शिवाई ट्रस्टविरोधात तक्रार दाखल झाल्यामुळे ठाकरेंच्या हातातून सेनाभवनही (Shiv Sena) जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, कारण सेनाभवनचा मालकी हक्क शिवाई ट्रस्टकडे आहे.

 

काय म्हणाले योगेश देशपांडे?
आतापर्यंत ही सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात आलेली होती. ही जागा कुणाची आहे, कुणाच्या नावावर आहे? सर्वसामान्यांचा असा समज होता, की ही शिवसेनेची (Shiv Sena) जागा आहे. असाच माझाही समज होता. हे गोपिनियता बाळासाहेबांनीच ठेवली होती का? याबाबत मी अधिक माहिती घेतली असता ही जागा शिवाई ट्रस्टची असल्याचे समजले. मग कोणत्याही ट्रस्टला जागा भाड्यावर देता येत नाही. एखाद्या राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली? परवानगी नसताना राजकीय पक्षाचे कार्यालय, इतक्या दिवस का वापरलं, असा प्रश्न उपस्थित होतो, असे देशपांडे यांनी म्हटले. कारवाई करा अन्यथा नुकसान भरपाई करा असेही तक्रारीत नमूद केले आहे.

 

तक्रारकर्त्याचे सवाल
– शिवाई ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट आहे. मात्र तुमच्या अधिकृत वेबसाईटच्या तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला शिवाई ट्रस्टबाबत फार माहिती मिळू शकली नाही.

– पब्लिक ट्रस्टच्या कार्य़ालयाचा वापर अनेक दशके-वर्षांपासून राजकीय कार्य़ांसाठी कसा केला जात आहे?

– जर असा वापर ट्रस्टच्या उद्दिष्टांचे उल्लंघन करत असेल, तर विश्वस्तांना का निलंबित/काढले जाऊ नये आणि प्रशासक का नियुक्त करु नये?

– आतापर्यंत झालेले नुकसान विश्वस्तांकडून का वसूल केले जाऊ नये?

 

Web Title :- Shiv Sena | Shiv Sena Bhavan will also go from Thackeray? Report to the Charity Commissioner against Shivai Trust

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त देसाई 10 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची भव्य पदयात्रा

Ashok Chavan | माझा घातपात घडवण्याचे कारस्थान, अशोक चव्हाणांची पोलिसांकडे तक्रार; राजकीय वर्तुळात खळबळ