Pune Kasba Peth Bypoll Election | भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची भव्य पदयात्रा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Late BJP MLA Mukta Tilak) यांच्या निधनामुळे होणारी कसबा पेठ पोटनिवडणूक अटीतटीची झाली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) युतीकडून दिग्गज नेत्यांच्या सभा आणि रोड शोचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे कसब्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या प्रचारार्थ भाजपच्या नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची सोमवारी (दि.20) मतदारसंघात पदयात्रा काढण्यात आली. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सोमवारी मतदारसंघातून पदयात्रा काढली. या पदयात्रेची सुरुवात पालखी चौकातून झाली. यानंतर ही पदयात्रा वटेश्वर भुवन, रिझवानी मशीद, श्रमदान, दगडी शाळा, कस्तुरे चौक, जैन मंदिर, बावन बोळ, गाडीखाना नेहरू चौक, गोटीराम भैय्या चौक, शिवाजी महाराज रस्त्याने आंग्रेवाडा येथे या पदयात्रेचा समारोप झाला.

या पदयात्रेमध्ये कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख माधुरी मिसाळ (Chief Election Officer Madhuri Misal),
हेमंत रासने यांच्यासह कसबा मतदार संघातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व शहर पदाधिकारी, मंडल पदाधिकारी,
बुथ प्रमुख, शक्ती, केंद्रप्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

भाजपने पोट निवडणुकीच्या रिंगणात हेमंत रासने
यांना उमेदवारी दिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पदयात्रा, दुचाकी रॅली, व भेटीगाठींवर रासने यांनी जोर दिला आहे.
कसबा मतदार संघामध्ये रासने यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
रासने यांच्या प्रचारासाठी पालक मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.
याशिवाय भाजपने अनेक दिग्गज नेत्यांच्या सभांचे आयोजन केले आहे.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Pankaja Munde’s rally to campaign for BJP candidate Hemant Rasane in pune kasba peth bypoll election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | ‘… तर 2024 ची निवडणूक शेवटची ठरु शकते’, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान (व्हिडिओ)

MP Sanjay Raut | संजय शिरसाट यांनी संजय राऊतांची तुलना केली पिसाळलेल्या कुत्र्याशी, म्हणाले – ‘इंजेक्शन द्यावं लागेल’

Pune Crime News | 24 वर्षाच्या तरुणीचा नवले पुलावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न, पुणे पोलीस आणि नागरिकांमुळे तरुणी बचावली

Pune Crime News | सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली दरोडेखोरांची टोळी कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 4 दुचाकीसह कोयता, तलवार जप्त