शिवसेनेचे बडे नेते आयकर विभागाच्या ‘रडार’वर ? युती तुटताच BMC च्या कंत्राटदारांवर ‘छापे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि भाजपा यांची युती तुटल्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयकर विभाग सक्रीय झाला असून त्याने मुंबई महापालिकेतील ३७ कंत्राटदारांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मुंबई महापालिकेतील कोट्यवधींचा गैरव्यवहार उघड झाला आहे. त्यातून ७३५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार समोर आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातूनच शिवसेनेचे अनेक बडे नेते आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. या कंत्राटदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुंबई महापालिकेशी संबंधित नेत्यांकडे चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबई आणि सुरतमध्ये ६ नोव्हेंबरपासून कंत्राटदारांवर ही कारवाई सुरु असून आतापर्यंत ४४ जागांवर छापे टाकण्यात आले आहेत. त्यात ३७ बडे कंत्राटदार, तसेच राज्यातील काही एन्ट्री ऑपरेटरची कार्यालये व निवासस्थानांची झडती घेण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे ७३५ कोटी रुपयांच्या बनावट एन्ट्री व खर्चाच्या पावत्या मिळाल्याची माहिती पुढे येत आहे. पालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा यात उल्लेख असल्याने संबंधित कंत्राटदारांकडून त्याबाबत खुलासे मागविण्यात आले आहेत.

या कंत्राटदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आयकर विभाग पुढील काही दिवसांमध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर कारवाई करु शकते, असे मानले जात आहे.

Visit : Policenama.com