खा. अमोल कोल्हेंची संसदेत गर्जना, शिवसृष्टीबाबत केली ‘ही’ मागणी (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी किल्ले शिवनेरीवरती शिवसृष्टीची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाच्या पूर्ततेसाठी अमोल कोल्हे यांनी संसदेत शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याची मागणी केली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे.

या आधी देखील खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत बैलगाडा शर्यतींचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर आता सुरु झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कोल्हे यांनी शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारावी अशी मागणी केली आहे.

"किल्ले शिवनेरी"वरती शिवसृष्टीची निर्मिती व्हावी : खासदार डॉक्टर अमोल कोल्हे लोकसभा प्रचारामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर अंतर्गत किल्ले शिवनेरीवरती शिवसृष्टीची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते याच आश्वासनाची मागणी आज संसदेत शून्यप्रहारामध्ये केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसृष्टीची निर्मिती झाली तर विश्वातील संपूर्ण शिवभक्तांसाठी हे एक प्रेरणास्थळ असेल.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासाठी प्रेरणादायी आहे, शिवसृष्टीच्या निर्मितीमुळे जगाला छत्रपती शिवरायांचा जीवनपट अनुभवता येईल, सोबतच रोजगार निर्मिती होईल आणि पर्यटनास चालना मिळेल. किल्ले शिवनेरी वरती जाण्यासाठी किल्ले आबाल-वृद्ध,माता-भगिनी यांना शिवजन्मभूमीवरती जाण्यासाठी रोप-वे ची निर्मिती करून द्यावी अशी सुद्धा आग्रही मागणी संसदेत केली . जय शिवराय !

Geplaatst door Dr.Amol Kolhe op Dinsdag 10 december 2019

यावेळी ते म्हणाले जर ही शिवसृष्टी उभारली तर संपूर्ण शिवभक्तांसाठी हे एक प्रेरणास्थळ असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे, शिवसृष्टीमुळे संपूर्ण जगाला शिवरायांचा जीवनपट अनुभवता येईल. तसेच रोजगार निर्मिती होऊन पर्यटनास चालना मिळेल असे कोल्हे यावेळी बोलताना म्हणाले.

अमोल कोल्हे यांनी संसदेच्या पहिल्याच भाषणात छत्रपती शिवरायांचे भाषण करून सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. शिवनेरीवर जाण्यासाठी रोपवेची निर्मिती करावी अशी देखील मागणी अमोल कोल्हे यांनी संसदेत केली.

Visit : Policenama.com 

 

You might also like