चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास पुसण्याचा ‘धक्कादायक’ प्रकार, शिक्षण मंडळाने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

मुंंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात न आल्याने केंद्र सरकारवर टीका करण्यात येते. परंतू आता राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने तोच कित्ता गिरवला आहे. सध्या निवडणूक सुरु असल्याने निवडणूकीत शिवाजी महाराजांच्या नावाचा पुरेपूर वापर करण्यात येतो, जेव्हा त्यांचा इतिहास पुस्तकात मांडण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्याकडे दूर्लक्ष करण्यात येते. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आला आहे. परंतू त्यावर नंतर शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आले की शिवाजी महाराजांचा इतिहास सहावीच्या पुस्तकात देण्यात येईल.

राज्याची संस्कृती ठेवा जपण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण राज्यातील विद्यार्थांना मिळावे या हेतूने महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाद्वारे यंदा पहिली ते चौथीच्या पुस्तकांची छपाई करण्यात आली आहे. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात पारित झाला होता.

आतापर्यंत अनेक सरकारे आली गेली परंतू पुस्तकातील अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कायम ठेवण्यात आला. काँग्रेसचे माजी खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करणाऱ्या भाजपा-शिवसेनेचे सरकार हद्दपार करण्याची हीच ती वेळ. त्यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी आता घालवुया सरकार हे एकच उद्दिष्ट ठेवून काम करायला हवे असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

खासदार संभाजी महाराज यांनी देखील या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून पुसण्याचा घाट घातला गेला असेल तर सहन करणार नाही, ज्यांनी कोणी हे करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी यावर सडकून टीका करताना सांगितले की, हे करण्याचे धाडसच कसे झाले? मी केंद्रीय शिक्षण मंडळाकडून शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्यात यावा यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी मी शिक्षण मंत्र्यांची देखील या संदर्भात भेट घेतली. देशभरात महाराजांचे कर्तृत्व पोहचावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेेने आणि सर्व पक्षीय नेत्यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असताना मात्र महाराष्ट्रातच उलटी गंगा वाहते? हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.

सहावीच्या पुस्तकात इतिहास असणार
शिक्षण आयुक्त आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे प्रभारी संचालक विशाल सोळंकी आणि सचिव विकास गरड यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला होता. परंतू त्यानंतर देण्यात आलेल्या शिक्षण मंडळाच्या स्पष्टीकरणात सांगण्यात आले की शिवाजी महाराज्यांचा इतिहास विस्तृतपणे सहावीच्या पुस्तकात देण्यात येणार आहे.

काय आहे पुस्तकात
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची कोणतीही ओळख देखील करुन देण्यात आली नाही. राज्य मंडळाच्या पुस्तकात ज्या प्रमाणे कथेच्या रुपात शिवाजी महाराज्यांच्या इतिहासाची माहिती देण्यात येते त्याचा देखील यात समावेश नाही. भारतीय लोक या घटकात शिवाजी महाराज, रामदास स्वामी, एकलव्य, लाल बहादूर शास्त्री आणि हनुमान यांच्याबाबत त्रोटक शब्दात माहिती देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी