Shivaji Nagar Pune Crime | पुणे : बिटकॉईन विक्री करण्याच्या बहाण्याने 7 लाखांची फसवणूक, महिलेवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivaji Nagar Pune Crime | बिटकॉइनची विक्री (Helping Of Selling Bitcoins) करण्यास मदत करण्याच्या बहाण्याने सात लाख रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर (Sahakar Nagar Pune) येथे राहणाऱ्या महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 एप्रिल रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास घडला आहे.

याबाबत नितीन लक्ष्मणराव भोसले (वय-44 रा. कुमारपदमा, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन प्रित त्रिवेदी (वय-32 रा. हेरम सोसायटी, सहकार नगर, पुणे) हिच्यावर आयपीसी 419, 420, 465, 467, 471, सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Shivaji Nagar Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रित त्रिवेदी हीने फिर्यादी यांना बिटकॉईनची विक्री करण्यास मदत करते असे भासवले. बिटकॉइन फ्रेझ प्राप्त करुन क्रिप्टो करन्सी अकाऊंटमध्ये फेरबदल केले. फिर्यादी यांचे क्रिप्टो करन्सी अकाउंट हॅक करुन त्यामधून 8 हजार युएसडी (अंदाजे किंमत सात लाख रुपये) चोरी केली.
यानंतर प्रित त्रिवेदी हिने फिर्यादी यांना चोरलेले पैसे परत केल्याचा मेसेज केला.
तिने बिटकॉइन अकाउंट प्रमाणे हुबेहुब बनावट मेसेज नितीन भोसले यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवला.
आरोपीने फिर्यादी यांना पैसे पाठवल्याचे खोटे भासवून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने (PI Anil Mane) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात