Shivajinagar District Court | जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये, ‘या’ वेळेत होणार सुनावणी; जाणून घ्या

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) निर्देशानुसार शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाचे (Shivajinagar District Court) कामकाज पुन्हा केवळ एकच शिफ्टमध्ये चालणार आहे. बुधवारपासून (ता. 23) न्यायालयीन कामकाज सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित सुरू राहणार आहे. न्यायाधीश मात्र पूर्ण क्षमतेने कार्यरत असणार आहेत. Shivajinagar District court proceedings again in one shift The hearing will be held from 11 am to 3 pm

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

न्यायालयीन कामाची वेळ पुन्हा कमी केल्याने वकिलांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने 15 जूनपासून न्यायालये पूर्ण क्षमेतेने दिवसभर खुली करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोरोना पॉझिटिव्ह रेट पाचच्या आत असल्यास न्यायालय पूर्णवेळ सुरू राहणार आहे. मात्र, मागील काही दिवसात कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट वाढला आहे. तो पाचच्या पुढे गेला आहे. त्यामुळे शहर लेव्हल दोनला गेले आहे. याबाबतची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यानंतर पुन्हा न्यायालय एका सत्रात सुरू झाले आहे.

कोरोनाच्या पॉझिटिव्ह रेटमध्ये दररोज बदल होत आहे.
त्यामुळे लगेच न्यायालय एका सत्रात करणे योग्य नाही.
असे म्हणणे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांच्याकडे पुणे बार असोसिएशनने मांडले आहे.
मात्र, उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार न्यायालय एकवेळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना परिस्थितीत वकील काळजी घेऊन काम करत आहेत.
पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी झाला आहे.
त्यामुळे काही दिवसांसाठी न्यायालय एकवेळ एका सत्रात सुरू ठेवणे योग्य वाटत नाही.

ऍड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

Web Titel :- Shivajinagar District court proceedings again in one shift The hearing will be held from 11 am to 3 pm

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या पत्नीचे गंभीर आरोप !

Reserve Bank of India । नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 3 सहकारी बँकांवर RBI ची कारवाई; बारामती अन् इंदापूरच्या बँकेचा समावेश

WhatsApp ची ही आहेत टॉप सीक्रेट फिचर्स, जी बदलून टाकतील तुमच्या चॅटिंगचा अनुभव; जाणून घ्या