Shivsena | शिंदेंच्या राजकीय हालचालीची माहिती उद्धव ठाकरेंना होती, परंतु…, शिवसेनेने केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वर्षा बंगल्यावर बोलवलं, मुख्यमंत्री (CM) तुम्हाला व्हायचं असेल तर मी पायउतार होतो असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. या घटनेला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) साक्षीदार होते. शिंदेंच्या राजकीय हालचालीची माहिती उद्धव ठाकरे यांना होती. आमदारांना (MLA) माझ्यासमोर आणा, आपण चर्चेतून मार्ग काढू असे देखील उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना कळवलं होतं. परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर (Legislative Council Election) आमदारांनी सूरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास सुरू केला, असा खुलासा शिवसेनेचे (Shivsena) जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान (Harshal Pradhan) यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

 

चर्चेतून मार्ग काढू असे सांगितले, मात्र…
मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला प्रत्येक राजकीय हालचालीची माहिती असते. संपूर्ण पोलीस विभाग (Police Department) ही माहिती पुरवत असतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना काय प्रॉब्लेम आहे? असं विचारलं. तर आमदारांना भाजपसोबत (BJP) जायचं आहे असं ते म्हणाले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ज्यांना भाजपसोबत जायचं आहे त्यांना माझ्यासमोर आणा, मी सर्वांशी बोलतो. त्यावर चर्चा करुन मार्ग काढू असे ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना सांगितले हेते. तेव्हा ठीक आहे मी घेऊन येतो असं शिंदेंनी म्हटलं मात्र त्यानंतर ते आमदारांना घेऊन सूरत (Surat), गुवाहाटी (Guwahati), गोवा (Goa) गाठलं, असं हर्षल प्रधान यांनी सांगितलं.

 

शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव
हर्षल प्रधान पुढे म्हणाले, भाजपला शिवसेना (Shivsena) संपवायची आहे. ही भाजपची स्क्रिप्ट आहे. एकनाथ शिंदे यांचा वापर करुन शिवसेना संपवण्याचा डाव आहे. त्यामुळे शिवसेना कमकुवत झाली नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाची ताकद कमकुवत झाली. शिवसेनेचं काय नुकसान झालं? ज्या सामान्य माणसाला आमदार, खासदार, मंत्री बनवलं हे कुणामुळे झालं? शिवसेनेमुळेच. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या आजरपणाकडे लक्ष दिले नाही. शिवसेना हेच माझे कुटुंब आहे याचदृष्टीने ते काम करातात. आजही शिवसेना भवनामध्ये मराठी माणूस, हिंदू-मुस्लीम माणूस कामं घेऊन येतात, असेही प्रधान यांनी सांगितलं.

नेमकं काय चुकलं?
सत्ता मिळत नसल्याने भाजपने उद्धव ठाकरेंच्या हातातून सत्ता ओरबडून घेतली.
राज्यावर सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट होती
त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असता राज्याची आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला.
अडीच वर्षाच्या कालावधीत देशात नंबर एकचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना गौरवण्यात आले
हे काहींना बघवलं नाही. नेमकं काय चुकलं? या अवस्थेत महाराष्ट्र उभा असल्याचे प्रधान म्हणाले.

 

सुहास कांदेंना शिवसेनेनं ओळख दिली
प्रधान पुढे म्हणाले, बंडखोरांना काय देण्यात कमी पडलं? शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे.
ज्यांना शिवसेना माहिती नाही ते आता बोलत आहेत. सुहास कांदे (Suhas Kande) यांना शिवसेनेने ओळख दिली.
भुजबळ (Chhagan Bhujbal) पालकमंत्री असताना कांदे यांनी त्यांच्याविरोधात काम केलं. निधी हा जनतेचा असतो.
स्वत:चा नसतो असा टोला त्यांनी कांदे यांना लगावला.

 

शिवसेना संपवण्यासाठी त्यांचा वापर
बाळासाहेब (Balasaheb Thackeray) नेहमी म्हणायचे लोकांचा विश्वास जिंका.
बंडखोर आमदार शिवसेनेला सोडून गेले नाहीत, बाळासाहेबांना सोडलं नाही तर त्यांना फसवलं गेलं आहे.
भाजपचा डाव शिवसेना संपवण्याच आहे. शिवसेना संपवण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे.
सत्तेचा लोभ असणारी माणस तिकडे गेली आहेत, अशा शब्दांत हर्षल प्रधान यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला.

 

Web Title :- Shivsena | bjp leaders plan to end shiv sena by using cm eknath shinde says shivsena chief uddhav thackerays pr chief harshal pradhan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | कोंढव्यात गुंडांकडून चारचाकी, मोटारसायकल, टेम्पोच्या काचा फोडून दहशत

 

Shivsena | खरी शिवसेना कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश

 

Pune Rape Case | धक्कादायक ! महाविद्यालयीन तरुणीला पळवून नेऊन बलात्कार; कर्वे रोडवरुन चाकणला नेऊन केला अत्याचार

 

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार श्रीनाथ उर्फ शेरु परदेशी व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 90 वी कारवाई

 

Pune News | जयराज ग्रुपचे संस्थापक कै. हिराभाई शहा (चोखावाला) यांच्या 6 व्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर!