Shivsena Chandrakant Khair On Eknath Shinde – Ramdas Kadam | चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदे काँग्रेस तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Chandrakant Khair On Eknath Shinde – Ramdas Kadam | दसरा मेळावा (Dasara Melava) आणि रामदास कदम यांनी दापोलीत केलेल्या टीकेमुळे शिवसेना आणि शिंदे गटातील वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. आता शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रामदास कदम यांच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील हा वाद वाढणार असल्याचे दिसत आहे. (Shivsena Chandrakant Khair On Eknath Shinde – Ramdas Kadam)

 

चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे की, शिंदे गटाचे पदाधिकारी निवडणूक आयोगाकडे जात आहेत. पण, त्यांच्यातील अनेक पदाधिकार्‍यांना आम्ही शिवसेनेतून हाकलून दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना त्रास देण्याचे काम रामदास कदम आणि एकनाथ शिंदे करत आहेत. जितका तुम्ही त्रास द्याल, तितकी शिवसेना पेटून उठेल आणि शिवसेनेला सहानुभुती मिळत राहील. (Shivsena Chandrakant Khair On Eknath Shinde – Ramdas Kadam)

 

शिंदे आणि कदमांबद्दल गौप्यस्फोट करताना खैरे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी देशभर पक्षाचे नेटवर्क तयार केले आहे. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना युती काळात मंत्री केले, आधी ते उद्धवजींचा आदेश मानायचे. पण, आता अचानक काय झाले की, शिवसेनाच फोडायला निघाले. मूळात हे एकनाथ शिंदेच काँग्रेसमध्ये (Congress) जाणार होते. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) मुख्यमंत्री होते, तेव्हा शिंदे त्यांच्याकडे गेले. पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना अहमद पटेलांना (Ahmed Patel) भेटण्यास सांगितले. शिंदेंनी प्रयत्न केला, पण पुढे काही झाले नाही. रामदास कदम हे सुद्धा राष्ट्रवादीत (NCP) जाणार होते, पण बाळासाहेबांनी त्यांना रोखले. आता हे दोघे मांडीला मांडी लावून बसलेत.

खैरे पुढे म्हणाले की, रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंबद्दल (Balasaheb Thackeray) असे बोलत असेल, तर आम्ही शांत बसणार नाहीत.
ज्यांनी तुम्हाला मोठे केले, त्यांच्याबद्दल तुम्ही असे बोलता. रामदास कदम आणखी काही बोलले, तर लोक प्रत्यक्षात त्यांना जोडे मारतील.
मंत्री असताना त्यांनी खूप भ्रष्टाचार केला, अनेकांकडून त्यांनी पैसे खाल्ले.
मी त्यावेळेस तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) तक्रार केली होती.

 

दसरा मेळाव्यावर बोलताना खैरे म्हणाले, शिवतीर्थावर बाळासाहेबांनी 1966 पासून सर्व मेळावे घेतले आहेत.
ही शिवसेनेची परंपरा आहे, ती बदलू शकत नाही. दबाव टाकून त्रास द्यायचे काम करणार असाल,
तर शिवसैनिक (Shiv Sainik) संतापून उठेल.
मला आणि अंबादास दानवेंना गोमूत्राने धुतले पाहिजे, असे संदिपान भूमरे म्हणाले होते.
चांगले आहे ना मग, गोमूत्र पवित्र असते. पण, तुम्ही जी सात दारुची दुकाने उघडली आहेत, आता त्याच दारुने स्वतःला धुवा.
यासाठी कुठून पैसा आला, त्याचे उत्तर द्या. मंत्री असताना यांनी 30-30 कमिशन खाल्ले, तो अतिशय विचित्र माणूस आहे.

 

Web Title :- Shivsena Chandrakant Khair On Eknath Shinde – Ramdas Kadam | eknath shinde was going to congress and ramdas kadam was going to ncp says chandrakant khair

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CBI ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना पुण्यातील दूरसंचार विभागातील दोन बडे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Adv.Pravin Chavan | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून केलेली नियुक्ती रद्द

Maharashtra Politics | पक्षात बंडखोरी करणार्‍या शिंदे गटाची पक्षप्रमुखांनाच ऑफर; उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू, पण अट एकच…