Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आघाडी करण्यासंदर्भात दिले ‘हे’ आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या 40 आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ देत भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी (MLA) केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) हे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. आज (गुरुवार) उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती.

 

आज बोलवलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) म्हणाले, घरोघरी जाऊन लोकांची कामे करा.
मुंबईत ज्याप्रमाणे पक्षाचं काम सुरु आहे, त्याप्रमाणे इतर जिल्ह्यात देखील कामे सुरू करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.
तसेच लढाईसाठी तयार रहा, कोणताही विचार करु नका, असे सांगत आघाडी करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घ्या,
असेही उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

 

दरम्यान, राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 92 नगरपरिषदा (Municipal Council)
आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुकांना (Nagar Panchayat Election) स्थगिती देण्यात आली आहे.
8 जुलै रोजी निवडणूक आयोगाने (Election Commission) या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या.
परंतु ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत निवडणूक आयोगाकडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे.

 

Web Title :- Shivsena Chief Uddhav Thackeray | shiv sena chief uddhav thackeray held a meeting with all district chiefs in the state today

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा