Shivsena Chief Uddhav Thackeray | मुलं पळवणारे होते, आता बाप पळवणारे आलेत; उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड केल्यामुळे संपूर्ण शिवसेना अडचणीत आली आहे. आमदारांनंतर (MLA) खासदार (MP) देखील शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray)  हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज पदाधिकारी मेळाव्यात बंडखोरांवर सडकून टीका उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी केली.

 

आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकली होती, पण बाप पळवणाऱ्यांची औलाद आता महाराष्ट्रात फिरतेय असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी केला आहे. मुंबईवर सध्या गिधाडं फिरत आहेत, अमित शाह (Amit Shah) हे त्यापैकीच एक असल्याचा टोला त्यांनी लगावला. यंदाचा दसरा मेळावा (Dussehra Melava) शिवतीर्थावरच होणार असाही ठाम विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

 

शिवसेनेत बंड झाल्यानंतर आज पहिलीच जाहीर सभा गोरेगावमध्ये होत आहे. या सभेच्या व्यासपीठावर शिवसेनेचे फायब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नावाची एक खुर्ची ठेवण्यात आली आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतात. ते मिंधे गटात गेले नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवली आहे, असे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर (BJP) जहरी टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबईवर आज गिधाडं फिरत आहेत.
निवडणुका आल्यावरच यांना मुंबईची आठवण येते. अमित शाह हे त्यापैकीच एक.
शिवसेनेला त्यांना आस्मान दाखवणार असल्याचं सांगितलं. पण आम्ही त्यांना आस्मान दाखवणारा आहोत.
ही शिवसेना मराठी माणसाच्या बलिदानातून मिळाली आहे. यांना ही हातात घेऊन विकायची आहे.
शिवसेना म्हणजे एक विश्वास आहे, एक आधार आहे, म्हणून शिवसेनेवर मुंबईकर विश्वास ठेवतात.
मुंबईवर ज्या ज्या वेळी संकटं आली त्या त्या वेळी शिवसैनिक धावून गेले होते असंही ते म्हणाले.

 

Web Title :- Shivsena Chief Uddhav Thackeray | shivsena melava uddhav thackeray speech live on eknath shinde and bjp dasara melava

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Latur ACB Trap | अर्जित रजा मंजूर करण्यासाठी 6 हजार रुपये लाच घेताना मुख्याध्यपक आणि लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Adv.Pravin Chavan | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून केलेली नियुक्ती रद्द

Maharashtra Politics | पक्षात बंडखोरी करणार्‍या शिंदे गटाची पक्षप्रमुखांनाच ऑफर; उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू, पण अट एकच…