Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘मुंबई आणि कमळाबाईचा काय संबंध? मुंबईवर चालून येण्याचे धाडस करु नका’, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे लचके तोडण्यासाठी गिधाडांची औलाद फिरु लागली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) येऊन गेले. निवडणूक (Election) आल्यावरच तुम्ही येता, तुमच्यासाठी मुंबई (Mumbai) फक्त जमिनीचा तुकडा असेल, पण आमच्यासाठी ही मातृभूमी आहे. मुंबादेवी म्हणजेच मुंबई आमची आई आहे. आजकाल आईला गिळणारी लोकही येत आहे. मुंबई आणि कमळाबाईचा संबंध काय? अशा शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी भाजपवर सडकून टीका केली. मी पहिल्यांदा कमळाबाईवर बोलतोय. हा शब्द माझा नाही, बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) दिलाय. मुंबईवर चालून येण्याचे धाडस करु नका, असा इशाराही उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी दिला.

 

बाप पळवणारी टोळी फिरतेय
व्यासपीठावर आल्यानंतर आधी पाहिले आमचे वडील आहेत का जागेवर ते पाहिलं. आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकली होती. पण बाप पळवणाऱ्यांची औलाद आता महाराष्ट्रात फिरतेय असा घणाघात उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर केला. आज पदाधिकारी मेळाव्यात बंडखोरांवर त्यांनी सडकून टीका केली.

 

 

ही त्यांचीच औलाद
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ही लोक आमच्या वंशावर आमच्या घराण्यावर टीका करत आहेत.
मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र समितीत (Samyukta Maharashtra Samiti) सर्वात पुढे होते.
मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, यासाठी आम्ही लढलो. तेव्हा जनसंघ समिती फोडून बाहेर पडला.
ही त्यांचीच औलाद आहेत, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली.

वंश वादावर टीका करणार असाल तर…
दुर्दैवाने आपण त्यांच्यासोबत युती केली. मी पुन्हा म्हणतो, 25 वर्षे युतीत सडलो.
ही सगळी नालायक माणसे जोपासली. मेहनत आम्ही घ्यायची आणि फुकट त्यांना द्यायचं.
आमच्या जिवावर वरती पोचलात आणि आम्हाला लाथा मारताय. वंशवादावर टाकी करणार असला,
तर तुमचा वंश कोणाता, त्यावर आधी बोला, अशी टीका त्यांनी केली.

 

 

Web Title :- Shivsena Chief Uddhav Thackeray | shivsena uddhav thackeray what the connection between mumbai and bjp this is our motherland said uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CBI ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना पुण्यातील दूरसंचार विभागातील दोन बडे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Adv.Pravin Chavan | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून केलेली नियुक्ती रद्द

Maharashtra Politics | पक्षात बंडखोरी करणार्‍या शिंदे गटाची पक्षप्रमुखांनाच ऑफर; उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू, पण अट एकच…