Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘पुन्हा नवीन गुलाब फुलवीन, या झाडाला नवे गुलाब येतील’, उद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्यांना मोठे केले ते सोबत नसले तरी त्यांना मोठे करणारे माझ्यासोबत आहेत. आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पहा. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. भाजपला (BJP) गुलाब दिसत होते त्यांना कळेल की माझ्याकडे झाड होते, त्याचे गुलाब तुम्ही नेले आता काटे तुम्हाला बोचतील. पुन्हा नवीन गुलाब फुलवीन या झाडाला नवे गुलाब येतील, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे नाव न घेता टीका केली. जळगावमधील शिवसेनेचे कार्यकर्ते मातोश्रीवर जमा झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

 

उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून रोज लढाया सुरु आहेत. आपली लढाई दोन तीन पातळीवर सुरु आहे. एक रस्त्यावरील लढाई आहे, त्यात आपण कमी पडणार नाही. दुसरी लढाई कोर्टात (Court) सुरु आहे. आणि तिसरी लढाई ही तेवढीच महत्त्वाची आहे. ती लढाई म्हणजे कागदाची. शपथपत्र गोळा करा. हा विषय खूप गंभीर आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, कायद्याची लढाई सुरु आहे. ती लढाई आपले वकील किल्ला लढवत आहेत.
माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. आजपर्यंत शिवसेनेला फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले.
परंतु आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. हे मी आधीच बोललो होतो की, हा प्रयत्न शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न आहे.
परवा भाजप अध्यक्ष यांनी ते बोलून दाखवले. शिवसेना हा संपत चाललेला पक्ष आहे, असे ते म्हणतात.
पण त्यांना माहिती नाही की, शिवसेनेनं अशी आव्हानं पायदळी तुडवत त्यावर झेंडा रोवला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

 

भाजपला इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ठीक आहे राजकारणात हार जीत होत असते.
कधी कोण जिंकत असतं, तर कुणी पराभूत होत असतो. पण कुणी कुणाला संपवण्याची भाषा आपल्या देशात झाली नव्हती.
दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो तो संपतो, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.

 

Web Title : –  Shivsena Chief Uddhav Thackeray | uddhav thackeray slams shiv sena rebel gulabrao patil in matoshri mumbai meeting of jalgaon team

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा