आजचे ‘आयराम’ उद्याचे ‘गयाराम’ होतील, याची खात्री नाही : खा. संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षातील अनेक नेते शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत. याचा आनंद होत आहे, मात्र, देशातील स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्षाचं महत्व कमी करून चालणार नाही असे खासदार संजय राऊत यांनी सांगत सर्व आयारामांचे त्यांनी कान टोचले आहेत. लोकसभेत विरोधी पक्षनेता नाही व महाराष्ट्रातही तो ठेवायचा नाही हे काही मंडळींनी ठरवले असेल तर हे देशाचे अस्तित्व आणि लोकशाहीला ते मारक ठरेल, असेही त्यांनी सामनातील ‘रोखठोक’ सदरातून म्हटले आहे.

रोखठोक या सदरात ‘स्वर्ग बदलण्याची स्पर्धा’ या माथळ्याखाली संजय राऊत यांनी लेख प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी ज्यांच्यासाठी कालपर्यंत स्वर्ग होता ते सगळे नव्या स्वर्गाच्या दारात रांग लावून उभे आहेत. स्वर्ग बदलण्याची स्पर्धा लोकशाहीचा नरक करेल. विरोधी पक्ष नसेल तर देश कमजोर व लोकशाही ठिसूळ होते. राजकारण एकतंत्री बनते असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही ही भूमिका मांडली आहे, त्यामुळे मी देखील तशीच भूमिका मांडली आहे. भाजप-शिवसेनेत येत असलेल्या नेत्यांवर निषाणा साधताना, काही वर्षापूर्वी राजकारणात अस्पृष्य ठरलेल्या शिवसेना आणि भाजप पक्षाबाहेर लोक रांगे लावून उभे आहेत. जे रांगेत आहेत त्यांनी अनेकवेळा पक्ष सोडला आहे. त्यामुळे आजचे आयाराम हे उद्याचे गयाराम होणार नाहीत याची खात्री कोणीच देऊ शकत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या