Shivsena | शिवसेनेत मोठ्या खांदेपालटाची शक्यता, आदित्य ठाकरेंकडे येणार ‘हे’ पद, तर तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत (Shivsena) मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. शिवसेनेचे (Shivsena) भावी नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा तयार व्हावी, हा यामागचा उद्देश आहे. आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचे कार्याध्यक्षपद (Shiv Sena Working President) देण्यात यावे, अशी मागणी पक्षातून केली जात आहे. विशेष म्हणजे ठाकरेंचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनाही राजकीय मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. युवा सेनेची (Youth Sena) धुरा तेजस यांच्याकडे देण्याची मागणी केली जात आहे.

 

युवासेना (Yuvasena) ही शिवसेनेची यंग ब्रिगेड आहे. राज ठाकरे (Raj Thackeray), आदित्य ठाकरे यासारखे नेतृत्व युवासेनेतून तयार झाली. त्यामुळे तेजस यांनाही राजकारणात जम बसवण्याआधी बेस तयार करता यावा, यासाठी युवासेनेची धुरा सोपवण्याची मागणी केली जात आहे. तर आदित्य ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी त्यांच्यावर शिवसेने नेतेपदानंतर आता थेट कार्याध्यक्षपद देण्याची मागणी होत आहे.

 

तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार ?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray)
यांचे नातू आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray)
यांचे चिरंजीव असलेल्या तेजस यांच्याभोवती ‘ब्रँड ठाकरे’ चे वलय असल्याने शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी उपजत आकर्षण आहे.
त्यामुळे संकटात असलेल्या शिवसेनेला नवी उभारी देण्यासाठी तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय झाले तर त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो.
याआधी तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली होती.
मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. काही मोजक्या राजकीय घटना वगळता ते राजकारणापासून दूर राहिल्याचे पहायला मिळाले.
मात्र आता शिवसेनेचे बहुतांश मातब्बर नेते पक्ष सोडून गेल्यामुळे तेजस ठाकरेंना मैदानात उतरुन पक्षाला नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करु शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.

 

Web Title :-  Shivsena | maharashtra political news aditya thackeray reportedly deputed as shivsena executive chairman tejas thackeray to become yuvasena chief

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा