ताज्या बातम्यानांदेडराजकीय

Shivsena MLA Balaji Kalyankar | बालाजी कल्याणकर यांना निवडणुकीत पक्षाने दीड कोटी दिले, तरीही गद्दार झाले

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MLA Balaji Kalyankar | आमदार बालाजी कल्याणकर यांना पक्षाने निवडणुकीसाठी दीड कोटी रुपये दिले, तरीही गद्दार झाले, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव (Anand Jadhav) यांनी केला आहे. शिवसेनेचे नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर येथील शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (Shivsena MLA Balaji Kalyankar)

 

कल्याणकर यांच्या बंडखोरीनंतर नांदेडमध्ये शिवसेनेने संघटना मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कल्याणकर यांचा मतदार संघ असलेल्या नांदेड उत्तर मतदार संघात शिवसेनेने मेळावा घेतला. यावेळी नांदेडचे शिवसेनेच्या संपर्क आनंद जाधव यांनी हा गौप्यस्फोट केला.

 

संपर्कप्रमुख आनंद जाधव म्हणाले की, महाराष्ट्रातील कोणत्याच आमदाराला 1 कोटीच्या वर निधी दिला नव्हता.
कल्याणकर यांना दिड कोटी रुपये दिले तरीही ते गद्दार झाले.
एकाच गोष्टीचे वाईट वाटते की माझ्या बाळासाहेबांच्या, उद्धवसाहेबांच्या शिवसैनिकांनी जिवाचे राण केले,
रक्ताचे पाणी केले आणि कल्याणकर यांना निवडून दिले. परंतू, ते गद्दार झाले या गोष्टीचे सर्वात जास्त वाईट वाटते.

 

जाधव पुढे म्हणाले की, यापुढे बालाजी कल्याणकर यांना आयुष्यात गुलाल लागू देणार नाही.
या मेळाव्याला नांदेड उत्तरमधील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title :- Shivsena MLA Balaji Kalyankar | maharashtra political crisis nanded shiv sena liaison chief anand jadhav criticizes mla balaji kalyankar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Samantha Ruth Prabhu | समंथाने सांगितले लग्न तुटण्याचे कारण, म्हणाली….

 

Maharashtra Vidhansabha Speaker Election | शिवसेना मोठ्या खेळीच्या तयारीत? बंडखोरांवर विधानभवनाच्या गॅलरीतून ‘वॉच’?

 

Maharashtra Vidhansabha Speaker Election | शहाजीबापू मतदानासाठी उभे राहताच सभागृहात एकच कल्ला, सरनाईक-जाधवांच्या वेळी ‘ED-ईडी’ची शेरेबाजी

Back to top button