शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना ‘कोरोना’ ! अतिदक्षता विभागात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईच्या वॉक्हार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. प्रकाशु सुर्वे मागाठाणे मतदारसंघाचे आमदार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून काही लोकप्रतिनिधींना कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. काही दिसवांपूर्वीच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. यानंतर आता शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या संकटात लोकप्रतिनिधी आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्यांसाठी काम करत आहेत. यापैकीच काही आता कोरोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहेत.

कोल्हापुरात आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील आणि चंद्रकांत जाधव अशा 3 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. नांदेडमध्ये देखील जवळपास 6 नेत्यांना कोरोना झाला आहे. यातील काही नेत्यांनी कोरोनावर मात केली आहे तर काहींवर अद्याप उचपार सुरू आहेत.