Shivsena MP Arvind Sawant | नारायण राणेंना ‘बूड’ नसलेला व्यक्ती म्हणत अरविंद सावंत यांचा हल्लाबोल! म्हणाले – ‘आम्ही त्यांचा दोनदा ‘खुळखुळा’ केलाय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नारायण राणेंचा (Narayan Rane) आम्ही दोनदा ‘खुळखुळा’ केला आहे. त्यांचे चिरंजीव आणि ते स्वत: पराभूत झाले आहेत. त्यांनी स्वत:चा विचार करावा, असे वक्तव्य करत शिवसेना खासदार अरविंद सावंत (Shivsena MP Arvind Sawant) यांनी राणेंचा चांगलाच समाचार घेतला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते की, 2024 मध्ये मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही. यावर खासदार सावंत (Shivsena MP Arvind Sawant) यांनी प्रत्युत्तर दिले.

अरविंद सावंत (Shivsena MP Arvind Sawant) म्हणाले, मला वाटते की, त्यांच्यावर काहीही भाष्य करू नये. पण अगदीच दुर्लक्ष केले आहे, असे वाटू नये म्हणून एवढेच सांगतो की, त्यांनी स्वत:चा विचार करावा. आम्ही त्यांचा दोनदा ‘खुळखुळा’ करून ठेवला आहे. त्यांचे चिरंजीव आणि ते स्वत: पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांना असे बोलण्याचा काय नैतिक अधिकार आहे?

सावंत म्हणाले, ज्या लोकांना स्वत:चे बूड नाही. अशा लोकांची दखल कशासाठी घ्यायची.
त्यांनी पन्नास पक्ष बदलले. आधी शिवसेनेत होते, मग स्वाभिमानी पक्ष काढला. पुढे स्वाभिमान गहाण ठेऊन काँग्रेसमध्ये (Congress) गेले.

मग स्वाभिमानी पक्ष बंद करून भाजपात (BJP) प्रवेश केला. असा प्रवास करणार्‍या माणसाची नीतिमूल्ये काय आहेत? आणि त्यांचे नैतिक अधिष्ठान काय आहे?
त्यामुळे नीतिमूल्ये आणि नैतिक अधिष्ठान नसलेल्या लोकांच्या कुठल्याही भाष्याची माध्यमांनी सुद्धा दखल घेऊ नये, अशी माझी तुम्हाला विनंती आहे, असे सावंत म्हणाले.

Web Title :- Shivsena MP Arvind Sawant | shivsena mp aravind sawant on bjp leader narayan rane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा