Shivsena MP Gajanan Kirtikar | शिवसेनेनेच गजानन किर्तीकर यांचा मार्ग केला मोकळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Gajanan Kirtikar | खासदार गजानन किर्तीकर (MP Shivsena Gajanan Kirtikar) यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन आपला इरादा स्पष्ट केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी किर्तीकर यांची हकालपट्टी केली. त्यानंतर शुक्रवारी रात्री किर्तीकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. हा घटनाक्रम लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करुन त्यांना पक्षांतर बंदी कायद्यातून वाचविले असल्याचे मानले जात आहे.

 

शिवसेनेचे लोकसभेत एकूण १८ खासदार होते. त्यापैकी १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ देत आपला स्वतंत्र गट लोकसभेत स्थापन केला होता. त्याला लोकसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. असे असेल तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे ६ खासदार अजूनही आहेत. त्यामुळे कोणत्याही खासदाराला पक्ष सोडून जायचे असेल तर किमान ४ जणांनी पक्ष सोडण्याची आवश्यक होती. जर गजानन किर्तीकर यांनी एकट्यानेच पक्षांतर केले असते तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याखाली कारवाई होऊन त्यांची खासदारकी रद्द होऊ शकली असती. (Shivsena MP Gajanan Kirtikar)

गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर हा मात्र उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे.
त्यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरचिटणीस पद आहे.
अमोल यांनी आपल्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ते ऐकले नाही.
शेवटी त्यांची सुटका करण्यासाठी त्यांची शिवसेना नेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली.
तसे पत्रक सचिव विनायक राऊत यांनी काढले. त्यानंतर किर्तीकर यांनी रात्री बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
एकप्रकारे गजानन किर्तीकर यांचा पक्षांतरांचा मार्ग उद्धव ठाकरे यांनीच मोकळा करुन दिला, असे मानले जात आहे.

 

Web Title :- Shivsena MP Gajanan Kirtikar | It was the Shiv Sena that paved the way for Gajanan Kirtikar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

T20 World Cup | पाकिस्तानच्या PM ने केलेल्या ट्विटवर इरफानचे सडेतोड उत्तर, म्हणाला ” तुमच्यात आणि आमच्यात….”

Uddhav Thackeray | नाशकात ठाकरे गटात घरवापसी सत्र सुरु

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांवर टीकास्त्र, म्हणाले – ‘अनेक विकासकामे केली त्यामुळे विरोधकांना…’