संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला, म्हणाले – ‘वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकांतात भेट घेतील. आणि राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले. दरम्यान, पंतप्रधानांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात केले होते. दरम्यान, वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay raut) यांनी उत्तर दिले आहे. आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत (Sanjay raut) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राऊत म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो.
काल पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेशी पुन्हा मैत्री करण्याबाबत विधान केले होते. ते म्हणाले होते की, आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती.
उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले.
तसेच फडणवीस आणि पाटील यांच्याशी जमत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
का ते माहीत नाही. पण इकडे जर वाघाशी दोस्ती असती तर अठरा महिन्यांपूर्वीच सरकार आले असते.
मात्र मोदींनी सांगितले तर त्यांचा आदेश आमच्यासाठी आज्ञा आहे.
नेत्याचा आदेश म्हटल्यावर आम्ही वाट्टेल ते करू. पण तसे काही जरी घडले तरी निवडणुका या स्वतंत्रपणेच लढविणार.”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांनी राजकीय प्रचार करू नये, पश्चिम बंगालमध्ये जे झाले ते चुकीचे होते. पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करता कामा नये, मग ते मनमोहन सिंग असतील किंवा नरेंद्र मोदी असतील. बाळासाहेब ठाकरेही हीच भूमिका मांडायचे. तसेच भाजपाला जे यश मिळत आहे ते मोदींच्या चेहऱ्यामुळेच मिळत आहे. मोदी हेच भाजपाचे नेते आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

हे देखील वाचा

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा

केसांचे सौंदर्य खुलावण्यासाठी आवश्य करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Title : shivsena mp sanjay raut replied bjp leader chandrakant patil who said befriend tiger too