Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचं शिंदे गटाला आव्हान; म्हणाले – ‘मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही तो करुन दाखवणार?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Raut | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुकद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्री (CM) पदाचा राजीनामा दिला तसेच विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनाम्याची घोषणा केली. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळलं. आता भाजप (BJP) आणि शिंदे गटाचं सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ‘मी शिवसेनेचा (Shiv Sena) मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही तो करुन दाखवणार का?’ असा सवाल राऊत यांनी केला आहे.

 

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले, “शिवसेना पक्षप्रमुख यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी स्वतः राज्यपालांकडे जात आपला राजीनामा सुपूर्द केला. त्याआधी त्यांनी महाराष्ट्रातील नाहीतर, देशाच्या जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात कशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, हे त्यांनी अत्यंत संयमी आणि सभ्य भाषेत सांगितलं. त्यावेळी त्यांनी आपल्या लोकांनी दगाबाजी केली, खंजीर खुपसले, हे सुद्धा सांगितलं. अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर खुर्चीला चिकटून राहण्यात अर्थ नव्हता. कारण ठाकरे कधीही सत्तेचे लोभी नव्हते आणि नाहीत.”

पुढे राऊत म्हणाले, “कोणत्याही कारणामुळे बाहेर पडायचंय, खंजीर खुपसायचाय, दगाबाजी करायचीये म्हणून कारण का देता?
यासर्व प्रकरणात राष्ट्रवादीला, काँग्रेसला किंवा शरद पवार यांना दोष देतायत, यापैकी बहुसंख्य लोकांचं पालन पोषण हे राष्ट्रवादीत झालंय आणि फक्त मंत्रिपदासाठी ते आपल्याकडे आले होते.
त्यांना आपण सामावून घेतलं.” तर, “दरम्यान, त्यांच्यात काही हाडाचे, कडवट शिवसैनिक ते गेल्याचं आम्हाला दु:ख आहे.
कालपर्यंत आम्ही त्यांच्याबाबत भावना व्यक्त करत होतो. उद्धवजी व्यक्त करत होते, तुम्ही या म्हणून.
पण शेवटी काल त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, सरकार पाडण्याचं ते त्यांनी करुन दाखवलं.” अस ते म्हणाले.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut on maharashtra political crisis uddhav thackeray bjp leader devendra fadnavis sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत उध्दव ठाकरेंना 4 वेळा सांगितलं होतं ? जाणून घ्या

 

Airtel 365 Days Validity Plan | एक वर्षापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील सिम, मिळतील अनलिमिटेड कॉल्स; डेटा आणि SMS, ‘हा’ सर्वात स्वस्त एअरटेल प्लान

 

LIC Jeevan Umang Policy | ‘या’ स्कीममध्ये दररोज करा 45 रुपयांची गुंतवणूक, एकाच वेळी मिळतील 36 लाख