..’तेव्हा’ भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल : शिवसेना 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राजकारणात मुलं पळवण्याच्या चर्चा सुरु आहेत. आता शिवसेनेचे मुखपत्र सामानाच्या अग्रलेखातूनही हा विषय दिसत आहे. “भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्मवाक्य नव्हे. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी, अशी घणाघाती टीका शिवसेनेने अग्रलेखातून केली आहे. सुजय विखे-पाटील यांनी मंगळवारी काँग्रेसचा हात सोडत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर राजकारणात मुलं पळवण्यावरून आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली होती. त्यावर सामनाच्या अग्रेलेखातून शिवसेनेनं टीका केली आहे.

महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यात सात-आठ दिवसांत मोठा राजकीय भूकंप होईल, अशी घोषणा केली. त्यावरही शिवसेनेनं त्यांचे मत मांडले आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू नक्की कुठे आहे, भूगर्भातील हालचाली कुठे व कशा सुरू आहेत याचा अंदाज येत्या काही दिवसांत येईल.

उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल व ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील. त्यामुळे आपली माणसे आणि मूळ विचारच खरा. तरीही तरुण तडफदार सुजय विखे-पाटील यांच्या नव्या कारकीर्दीस आम्ही शुभेच्छा देत आहोत. तुम्ही आलात, आनंद आहे, असेही शिवसेना म्हणाली.

भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. काँग्रेस संस्कृतीवर पंतप्रधान मोदी यांनी कालच टीका केली आहे. काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे एकमेकांना पर्यायी शब्द असल्याचे मोदी यांचे म्हणणे आहे. दुसरे असे की, काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘इनकमिंग’ आज लाभदायक वाटत असले तरी पुढे ते तापदायक ठरू शकते, याचा अनुभव आम्ही घेतला आहे”, असा इशाराही शिवसेनेने दिला.

सत्ता आहे म्हणून आज लोक येतात आणि सत्ता जाताच दुसरा घरोबा शोधतात, असं म्हणत शिवसेनेनं राधाकृष्ण विखे-पाटलांवर टीका केली आहे. ते कधीकाळी शिवसेनेत होते. पितापुत्रांना एकाच वेळी केंद्रात आणि महाराष्ट्रात मंत्रीपदे फक्त शिवसेनेनेच दिली होती, पण युतीची सत्ता जाताच त्यांनी पलटी मारली, अशीही टीका त्यांनी केली आहे.

ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्मवाक्य नव्हे. ही काही संगीत किंवा गायकीची घराणी नव्हंत. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी. उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल व ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील. त्यामुळे आपली माणसे आणि मूळ विचारच खरा. तात्पुरती सूज काय कामाची?, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

ह्याही बातम्या वाचा –  

पुण्यात छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार 

दारु पिण्याच्या वादातून खडकी बाजारमध्ये खुन 

अमेरिकेतील अभियंत्याने लग्नाच्या अमिषाने महिलेला घातला १७ लाखाचा गंडा 

मी बारामती जिंकून दाखवेल : गिरीश महाजन 

हिंमत असेल तर मोदींनी ‘येथून’ निवडणूक लढवावी : ममता बॅनर्जी