Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena | काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओक्के मदी, या वाक्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गुवाहाटीच्या रॅडीसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि सर्व बंडखोर आमदारांसमोर बोलतानाचा शहाजीबापू पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात त्यांनी शरद पवारांविरूद्ध (Sharad Pawar) तुफान फटकेबाजी केली आहे. शहाजीबापूंच्या या फटकेबाजीला उपस्थित बंडखोर आमदार जोरजोरात हसून प्रतिसाद देत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. (Shivsena)

 

शहाजीबापू सर्व बंडखोर आमदारांना जुन्या राजकारणातील शरद पवार यांचे किस्से ऐकवताना व्हिडिओत दिसत आहेत. ते म्हणतात की, शरद पवार म्हणाले, वसंत दादा माझे वडिल आहेत, त्यांच्याच आशीर्वादाने मी मोठा झालेलो आहे आणि मी वसंत दादांना कधीच दगा देणार नाही आणि दीड वाजता तिथंच बातमी आली की, शरद पवारांनी बंड केलंय. काँग्रेसचं 40 आमदार घेऊन पळून गेलं. लगेच वसंत दादांनी राजीनामा दिला. शहाजीबापूंची ही फटकेबाजी सुरू असताना सर्व आमदार हसताना दिसत आहेत. (Shivsena)

शरद पवारांनी कशारितीने अनेकांचे राजकारण संपवले हे देखील शहाजीबापू यांनी आपल्या खास शैलीत सांगितले. यावेळी सुद्धा उपस्थित आमदार जोरजोरात हसून त्यांना दाद देताना दिसत आहेत. यात ते म्हणतात की, एकनाथ शिंदेंच्या कामाची स्टाईल आम्ही पाहिली आहे. त्यामुळे, आम्हाला विश्वास आहे की, त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र प्रगत होईल.

 

डोंगार – झाडी – हाटील या संभाषणाची सुरुवात कुठून आणि कशी झाली याचा किस्साही गंमतशीरपणे शहाजीबापू पाटील यांनी सांगितला.

 

सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या झाडी, डोंगार, हाटील या वाक्याची भुरळ बंडखोर आमदारांनाही पडली आहे.
सकाळी सर्व आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असताना,
एकनाथ शिंदेंसह सर्वांनीच शहाजी बापूंचे मनापासून कौतुक केले आणि त्यांना पुन्हा एकदा हा डायलॉग म्हणून दाखवण्याची विनंती केली.
त्यानंतर, त्यांनीही हा डायलॉग बोलून दाखवला आणि एकच हशा पिकला.

 

Web Title :- Shivsena | otherwise you will not be able to smile at the rebellious mlas of guwahati by shahaji patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा