Shivsena Saamana Editorial | महाराष्ट्र तोडण्याच्या केंद्रीय योजनेस ‘या’ दोघांचा छुपा पाठिंबा तर नाही ना ? शिवसेनेचा घणाघात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Shivsena Saamana Editorial | महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळ स्थापनेच्या वाटावाटी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री कालपासून दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. ही संधी साधून शिवसेनेने सीमाप्रश्नावरून मुख्यमंत्री शिंदे यांना कोंडीत पकडले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना सावध करताना शिवसेनेने म्हटले आहे की, भाजपाच्या (BJP) हो ला हो केलेत तर मुंबई हातची जाईलच, पण महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे मनसुबे भाजपा तडीस नेईल. आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने हा बाण मारला आहे. (Shivsena Saamana Editorial)

 

शिंदे – फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करताना सामनाच्या अग्रलेखातून गंभीर प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, महाराष्ट्राचे तीन तुकडे करून तीन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा विचार दिल्लीच्या मनात आहे व त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असे कर्नाटकातील भाजपचे मंत्री जाहीरपणे बोलतात. त्यावर ना मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ना नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका. महाराष्ट्र तोडण्याच्या केंद्रीय योजनेस या दोघांचा छुपा पाठिंबा तर नाही ना ? या शंकेला वाव मिळत आहे. (Shivsena Saamana Editorial)

 

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडावी इतकेच. त्यांच्या गटाला मंत्रिपदे वाढवून मिळावीत यासाठीच हा दिल्ली दौरा असेल तर काहीच बोलायचे नाही. पण भाजपच्या ’हो’ला ’हो’ केलेत तर मुंबई हातची जाईलच, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे मनसुबे भाजप तडीस नेईल.

सामनातून घणाघात करताना शिवसेनेने म्हटले आहे,
एकनाथ शिंदे हे दिल्लीत शिवसेना फुटीचा, मराठी माणसांच्या एकजूट फोडीचा नजराणाच घेऊन जात असल्याने दिल्लीचे सरकार त्यांना काहीच कमी पडू देणार नाही.
तसे वचन पहिल्याच दिवशी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिलेच आहे.

 

अग्रलेखात पुढे म्हटले आहे, आरेचे जंगल तोडता येणार नाही, ते जंगल म्हणजे मुंबईचे फुप्फुस आहे,
अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर मांडली तर मुंबईचे लोक व जगभरातील पर्यावरणवादी मुख्यमंत्र्यांचे कौतुकच करतील.
शिंदे यांनी वेगळा मार्ग त्यांच्या मर्जीने स्वीकारला असला तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कोणी कौतुक करत असेल तर ते स्वीकारणारे ’मन’ आमचे आहे.

 

महाराष्ट्र तोडण्याच्या केंद्रीय योजनेस शिंदे – फडणवीस या दोघांचा छुपा पाठींबा तर नाही ना,
या शिवसेनेने केलेल्या गंभीर आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणते उत्तर दिले जातेय याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Shivsena Saamana Editorial | shivsena saamana editorial criticizes cm eknath shinde over maharashtra karnataka border dispute

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा