Shivsena | संजय राऊत ‘बोलबच्चन’ ! ‘मविआ’ची मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागली, आमदारानं सांगितलं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी होत आहेत. यानंतर आता शिवसेना खासदार देखील शिंदे गटात सामील होऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) 12 खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. तसेच वेगळा गट स्थापन करुन या गटाचे नेतृत्व राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्याकडे तर मुख्य प्रतोद म्हणून भावना गवळी (Bhavana Gawli) यांची निवड केली आहे. याच दरम्यान महाविकास आघडीची (Mahavikas Aghadi) मोठी किंमत शिवसेनेला (Shivsena) मोजावी लागली असा टोला शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांनी लगावला आहे.

 

आशिष जयस्वाल म्हणाले, आमदारांपेक्षा खासदारांची अवस्था अतिशय वाईट होती. पहिलं बंड खासदार करतील अशी अपेक्षा होती. मात्र, आमदारांनी पहिला उठाव केला. खासदारही भाजप सोबत युतीत निवडून आले होते. महाविकास आघाडीची मोठी किंमत शिवसेनेला (Shivsena) मोजावी लागली. केंद्राच्या सत्तेतून बाहेर पडावे लागलं. केंद्रात मंत्रिपद सोडून महाविकास आघाडीत गेले. अरविंद सावंत (Arvind Sawant) हे एकमेव मंत्री होते त्यांना राजीनामा द्यावा लागला. जिथे नम्मे मंत्रिमंडळ मिळणार होते तिथे एक तृतीयांश मंत्रिपदे मिळाली.

संजय राऊत बोलबच्चन
जयस्वाल पुढे म्हणाले, खासदार देखील आमदारांसारखा निर्णय घेतील यामध्ये शंका नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार येतील. संजय राऊत (Sanjay Raut) बोलबच्चन आहेत.
एखाद्या निवडणुकीत उभे राहून जिंकून येऊन दाखवा असे आवाहन त्यांनी केले.
निवडून येणाऱ्या प्रतिनिधीला न निवडून येणाऱ्या माणसाने काहीही टोमणे मारणे त्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही.
उद्धव ठाकरेही राऊतांवर नियंत्रण मिळवू शकत नाहीत. संजय राऊत यांना खुली सूट दिली आहे.
त्यामुळे त्यांच्या जीभेवर त्याचं नियंत्रण राहिलं नाही, अशा शब्दात त्यांनी संजय राऊंवर हल्लाबोल केला.

 

Web Title :- Shivsena | sanjay raut is bolbachchan shiv sena had to pay a heavy price for mahavikas aghadi says shiv sena mla ashish jaiswal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना केव्हा मिळेल 18 महिन्याचा DA एरियर? ही आहे मोठी अपडेट

 

Ramdas Kadam | रामदास कदमांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे आजारी, अजितदादांनी डाव साधला’

 

Shivajirao Adhalarao Patil | ‘या’ कारणामुळं तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली’ – आढळराव पाटील (व्हिडीओ)