Shivsena | नवा ट्विस्ट ! शिंदे-ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे दिलेली दोन नावं एकसारखी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह (Shivsena Dhanushyaban Symbol) निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शनिवारी रात्री गोठवलं. त्यानंतर आता शिंदे आणि ठाकरे गटांचा (Shivsena) नव्या वादाचा अंक सुरु झाला आहे. निवडणूक चिन्ह (Election Symbol) आणि पक्षाचे नाव (Party Name) गोठवल्यामुळे आयोगाने दोन्ही गटांना नवीन नाव आणि पक्षचिन्ह यांचे प्रत्येकी तीन-तीन पर्याय देण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने तीन नावं आणि तीन चिन्ह आयोगासमोर सादर (Submitted) केली आहेत.
उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना तीन नावांबाबत आणि पक्षचिन्हाबाबत माहिती दिली. तसेच आता एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) दिलेल्या नावांची माहिती समोर आली आहे. मात्र दोन्ही गटांनी दिलेल्या नावांमुळे नवा ट्विस्ट आला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाने आयोगाला सादर केलेल्या नावांमध्ये दोन नावे एक सारखीच आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पहावे लागेल.
ठाकरे गटाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे (Shivsena Balasaheb Thackeray), शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे (Shivsena Balasaheb Prabodhankar Thackeray) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) ही तीन नावं दिली आहेत. तर एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दोन नावांचा प्रस्ताव सादर केला आहे. यातलं एक नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं नाव शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे असं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी पक्षासाठी तीन चिन्हेही निवडणूक आयोगाकडे दिल्याचे सांगितले.
यामध्ये त्रिशूळ, मशाल, उगवता सूर्य ही तीन नावे दिल्याचे त्यांनी सांगितले.
अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri By-Election) काही दिवसांवर आली आहे.
त्यामुळे निवडणूक आयोगाला दोन्ही गटांना लवकरात लवकर नवीन नाव आणि चिन्ह द्यावे लागणार आहे.
Web Title :- Shivsena | shivsena vs shinde both camp submitted names and symbols to election commission
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update