Shivsena UBT – BJP | जुगाराच्या फोटोला दारूच्या फोटोनं प्रत्युत्तर, शिवसेना-भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले

मुंबई : Shivsena UBT – BJP | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांचा मकाऊतील कॅसिनोमधील (Macau Casino) फोटो शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर भाजपाने आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा हातात ग्लास असलेला फोटो पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही पक्षांमध्ये वेगळ्याच प्रकारचे राजकारण पहायला मिळत आहे. यावरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. (Shivsena UBT – BJP)

संजय राऊत यांनी सोमवारी चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनोतील फोटो ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करून पाहा ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है.

बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडविले. त्याचे २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आपल्याकडे आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. (Shivsena UBT – BJP)

यानंतर भाजपाने आदित्य ठाकरेंचा फोटो पोस्ट करून प्रत्युत्तर दिले. या फोटोमध्ये आदित्य ठाकरे यांच्या हातात ग्लास दिसत आहे. सोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलीकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की.

बावनकुळे यांचा कॅसिनोतील फोटो शिवसेनेने ट्विट केल्यानंतर एकच खळबळ उडाली.
यानंतर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली.
फडणवीस म्हणाले, राऊतांची मानसिकता विकृत झाली असून, हा राजकारणाची पातळी खालावणारा प्रकार आहे.
ते किती हताश झाले आहेत हे त्यातून लक्षात येते. बावनकुळे हे कुटुंबासह त्या हॉटेलमध्ये थांबले होते.
रेस्टॉरंट व कॅसिनो एकत्रितच आहे. राऊत यांनी जाणूनबुजून अर्धा फोटो ट्वीट केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो.
या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे.
जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक