Shivsena vs BJP | आमच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होतंय, शिंदे गटापुढे काहीच चालत नाही, भाजप आमदाराचे खळबळजनक वक्तव्य

कल्याण : Shivsena vs BJP | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून भाजपचे खच्चीकरण केले जात आहे. शिंदे गटापुढे भाजपचे काही चालत नाही ही वस्तूस्थिती आहे, असे वक्तव्य भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. (Shivsena vs BJP)

कल्याणमध्ये भाजपा आणि शिंदे गटात आलबेल नाही हे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे. मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारीच अडचणीत आणली जात असल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला आहे. येथे शिंदे गट आता चांगलाच आक्रमक झाला आहे. (Shivsena vs BJP)

दरम्यान, याच राजकारणावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भाजपा नेत्यांची खिल्ली उडवली होती. त्यांनी म्हटले होते की, कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा वाद आता विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटापुढे आता भाजपाचे काहीच चालत नाही. आमदार पाटील यांच्या वक्तव्याला खुद्द भाजपा आमदारानेच वरील वक्तव्य करून दुजोरा दिला आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात सतत कुरबुरी आणि चढाओढ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारणावरुन भाजपने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांची बदली न करता सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

त्यानंतर खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत मदत न करण्याचा ठरावच पक्षाच्या
बैठकीत केला. या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माघार घ्यावी लागली होती.

त्यानंतर कल्याण पूर्वचे शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजप आमदार गणपत गायकवाड
यांच्यात सोशल मीडियावर विकास कामांच्या मुद्यावर वाद झाला होता. मनसे आमदार राजू पाटील यांच्या
वक्तव्यानंतर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना गुन्हे शाखेकडून 24 तासात अटक, साडेतीन लाखांचा ऐवज जप्त

Manoj Jarange-Maratha Reservation | मी दोन पावलं मागे जातोय…कारण, मनोज जरांगे यांची माहिती; आंदोलनाची पुढील दिशाही सांगितली

Pune PMC Anti Encroachment Drive | भांडारकर रस्ता व कमला नेहरू पार्क परिसरातील हॉटेल्स व कॅफेंचे अनधिकृत बांधकाम पाडले